मुंबई, एप्रिल 2026 – तुमच्या जीवन विम्याने तुम्हाला निरोगी राहण्यास मदत केली आणि ते करताना तुमच्या पैशात वाढ केली तर?
जेव्हा काहीतरी बिघडतं, तब्येत बिघडते तेव्हा आपल्यापैकी बहुतेकजण संरक्षण किंवा आरोग्य कव्हरेजबद्दल विचार करतात. तोपर्यंत अनेकदा योजना आखण्यास उशीर झालेला असतो. टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स शुभ हेल्थ क्रिटीसह बदलतो आहे, ही अशा प्रकारची पहिली युनिट-लिंक्ड जीवन विमा योजना आहे, जी तुम्हाला कालांतराने समर्पित आरोग्य निधी तयार करून देते. यातून मार्केट-लिंक्ड रिटर्न कमावणे शक्य आहे. यासोबतच 60+ गंभीर आजारांना कव्हर करण्यासोबतच उपचारांसाठी करमुक्त पैसे काढण्याची परवानगी यात मिळते. त्यामुळे तुम्हाला जेव्हा त्याची सर्वात जास्त गरज असते तेव्हा पैसे आधीच उपलब्ध असतात. अधिक माहिती www.tataaia.com वर उपलब्ध आहे.
एक फंड, केवळ पॉलिसी नाही
शुभ हेल्थ क्रिटी जीवन विमा आणि संरक्षणाची रचना कशी असू शकेल, याची पुनर्कल्पना करते. निदानाच्या आधारे चालणाऱ्या पारंपारिक पेआउटऐवजी, ही योजना पॉलिसीधारकांना आरोग्य निधी जमा करू देते जो मार्केटशी निगडीत परतावा मिळवतो आणि गंभीर आजारावरील उपचार, प्रक्रिया किंवा संबंधित खर्चासाठी करमुक्त असतो, तसेच हा निधी काढता येतो. या योजनेत 60+ गंभीर आजारांचा समावेश आहे, प्रीमियम 30 वर्षांसाठी लॉक केला आहे आणि मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास प्रीमियम माफीचा समावेश आहे. त्यामुळे ठरवल्याप्रमाणे आयुष्य जात नसले तरी निधी वाढतच जातो. कव्हरेज लवचिकता, पात्रता अटी आणि वेलनेस प्रोग्राम तपशीलाची माहिती ग्राहकांना www.tataaia.com यावर उपलब्ध आहे.
केवळ संरक्षणासाठी नव्हे तर प्रतिबंधासाठी तयार केलेले
टाटा एआयएची वेलनेस इकोसिस्टम – हेल्थ बडीसह शुभ हेल्थ क्रिटी वेगळे ठरते. कॅन्सर स्क्रीनिंग आणि नियमित आरोग्य मुल्यांकनांपासून वैयक्तिकृत आरोग्य ट्रॅकिंगपर्यंत, ही योजना तुम्हाला केवळ प्रतिसाद देत नाही तर जोखमीपासून लांब ठेवते.
संशोधन सातत्याने दाखवते की कर्करोग, हृदयविकार आणि स्ट्रोक यांसारख्या आजारणाचे लवकर निदान झाल्याने परिणामात लक्षणीय सुधारणा होते. हेल्थ बडी त्या अंतर्दृष्टीचे कृतीत रूपांतर करते.
“आरोग्य नियोजन नेहमीच प्रतिक्रियाशील असते- जेव्हा काहीतरी चुकीचे घडते होतात तेव्हा सुरक्षेचे जाळे असते. शुभ हेल्थ क्रिटी हे समीकरण बदलते. हा एक असा फंड आहे जो तुम्ही तयार करता, भविष्यासाठी तुम्ही योजना आखता आणि एक निरोगी इकोसिस्टम आहे जी तुम्हाला निरोगी ठेवते,” असे जिलानी बाशा चीफ बिझनेस ऑफिसर, पार्टनरशिप डिस्ट्रिब्युशन आणि ग्रुप बिझनेस, टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स म्हणाले.
दृष्टिक्षेपात ठळक वैशिष्ट्ये
- 60+ गंभीर आजारांचा समावेश
- 30 वर्षांची प्रीमियम हमी – कोणतीही अनपेक्षित वाढ नाही
- मार्केट-लिंक्ड हेल्थ फंड – तुमच्या गुंतवणुकीसह वाढतो
- ड्युअल लाइफ ओपीडी कव्हर – तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी ओपीडी कव्हरेज
- मृत्यू किंवा अपंगत्वावर प्रीमियम माफी
- टर्म बूस्टरसह टर्मिनल इलनेस
- अपघाती संपूर्ण आणि कायमचे अपंगत्व लाभ आणि अपघाती मृत्यू लाभ कव्हर
- तुमच्या आरोग्य निधीतून करमुक्त पैसे काढणे
- हेल्थ बडी प्रीमियम्सचा परतावा
- प्रवेशाचे वय (मागील वाढदिवसाचे वय): 18/65 वर्षे
अधिक जाणून घ्या
टाटा एआयए शुभ हेल्थ क्रिटी आणि त्याच्या क्रिटी केअर फायद्यांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया भेट द्या www.tataaia.com.
टाटा एआयए शुभ हेल्थ क्रिटी सोल्यूशनमध्ये टाटा एआयए हेल्थ एसआयपी, टाटा एआयए हेल्थ बडी आणि टाटा एआयए कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोटेक्शन रायडर यांचा समावेश आहे. मार्केट लिंक्ड रिटर्न्स गुंतवणूक जोखमीच्या अधीन असतात. कृपया विक्री पूर्ण करण्यापूर्वी विक्री माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचा.





