पुणे : जिद्द, मेहनत आणि ग्राहकांचा विश्वास यांच्या जोरावर आर्थिक सेवा क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे राजू पवार यांनी म्युच्युअल फंड वितरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातून पुण्यात आलेल्या पवार यांनी आज सुमारे ₹११० कोटींची म्युच्युअल फंड मालमत्ता संकलित केली असून, त्यांचा मासिक एसआयपी व्यवसाय ₹९५ लाखांवर पोहोचला आहे. ते देश-विदेशातील सुमारे ७०० ग्राहकांना आर्थिक सेवा देत आहेत.
रसायनशास्त्रातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर पवार १९९७ मध्ये पुण्यात आले. २६ जानेवारी १९९८ रोजी त्यांनी विमा क्षेत्रात प्रवेश केला. वडिलांच्या एलआयसीमधील संबंधातून त्यांना या क्षेत्राची प्रेरणा मिळाली. २००३ मध्ये आरोग्य विमा क्षेत्रातही त्यांनी काम सुरू केले. जवळपास ४० मृत्यू-दाव्यांच्या प्रसंगी त्यांनी संबंधित कुटुंबांना मदत करून आर्थिक संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
सुमारे १३ वर्षांपूर्वी मित्र सुनील कडलक यांच्या माध्यमातून त्यांचा NJ Wealth सोबत प्रवास सुरू झाला. NJ Wealth च्या E-Wealth प्लॅटफॉर्ममुळे त्यांच्या कामकाजात मोठी कार्यक्षमता आली. पूर्वी एका तासात एक फॉर्म पूर्ण होत असे; आता त्याच वेळेत सुमारे १० खाती सुरू करणे शक्य झाले आहे.
कोविड काळातील बाजारातील अस्थिरतेतही त्यांनी ग्राहकांना संयम राखण्याचा आणि एसआयपी गुंतवणूक सुरू ठेवण्याचा सल्ला दिला.
ग्राहकांचा विश्वास आणि त्यांच्या गरजांना प्राधान्य देणे हेच यशाचे सूत्र असल्याचे पवार सांगतात. भविष्यात NJ Wealth च्या सहकार्याने ₹१,००० कोटींची एयूएम गाठण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.





