- फोर्स मोटर्स पात्र ठरणाऱ्या एंड-ऑफ-लाईफ वेईकल्ससाठी अधिकृत स्क्रॅपेज सुविधा मिळवून देण्यास मदत करणार.
- हा उपक्रम वेईकल्सची जबाबदार विल्हेवाट, पुनर्वापरयोग्य घटकांचा पुनर्वापर आणि संघटित वेईकल स्क्रॅपेजबद्दल अधिक जनजागृती करण्यासाठी साह्य करणार.
- रोझमर्टा रिसायकलिंगसोबत सहयोगाच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या रजिस्टर्ड वेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटीचा लाभ घेता येणार.
पुणे, २२ ऑक्टोबर २०२६: फोर्स मोटर्स लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या व्हॅन उत्पादक आणि आघाडीच्या ऑटोमोटिव्ह कंपनीने आज ग्राहकांसाठी अधिकृत स्क्रॅपेज सुविधा उपलब्ध करून देत जबाबदार एंड-ऑफ-लाईफ वेईकल व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणाऱ्या नवीन उपक्रमाची घोषणा केली.
रोझमर्टा ऑटो रिसायकलिंग प्रायव्हेट लिमिटेडसोबत सहयोगाच्या माध्यमातून फोर्स मोटर्सचे दिल्ली-एनसीआर भागातील ग्राहकांसाठी अधिकृत वेईकल स्क्रॅपेज सुविधा अधिक सुलभ बनवण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे या भागातील कमर्शियल व्हेईकल रिप्लेसमेंट स्कीमला पाठबळ देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासोबत (एमओआरटीएच) स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारांतर्गत (एमओयू) असलेली कंपनीची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. दिल्ली-एनसीआरपासून सुरुवात करून कंपनी ग्राहकांना अधिकृत स्क्रॅपेज केंद्रांपर्यंत पोहोचणे सोपे व्हावे आणि जबाबदार एंड-ऑफ-लाईफ वेईकल व्यवस्थापनाला प्रोत्साहन मिळावे म्हणून देशाच्या इतर भागांतही अशाच सहयोगांचे पर्याय शोधणार आहे.
फोर्स मोटर्ससाठी हा उपक्रम केवळ वेईकल्सची विक्री आणि वापरापुरता मर्यादित नसून ग्राहकांबाबत व्यापक जबाबदारीचा दृष्टिकोन दर्शवतो. नियमित देखभाल आणि वेळेवर वेईकल बदलणे हे जितके महत्त्वाचे आहे, तसेच जुन्या झालेल्या वेईकल्स जबाबदारीने वापरातून काढून टाकणे तितकेच महत्त्वाचे आहे. अधिकृत स्क्रॅपेजमुळे वापराचा कालावधी संपलेल्या वेईकल्स योग्य प्रक्रियेतून जातात आणि एरवी वाया जाणाऱ्या घटकांचे संकलन व रिसायकलिंग करणे शक्य होते.
या व्यवस्थेअंतर्गत पात्र फोर्स मोटर्स ग्राहक रोझमर्टाच्या रजिस्टर्ड वेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटी (आरव्हीएसएफ)चा लाभ घेऊ शकतील, जेथे वेईकल्सवर आवश्यक कागदपत्र प्रक्रिया, डिपॉल्युशन (प्रदूषणमुक्त करणे) आणि सुटे भाग वेगळे करण्याची प्रक्रिया केली जाईल. तसेच हे केंद्र पुनर्वापरयोग्य सामग्रीचे वर्गीकरण आणि पुनर्प्राप्ती करण्यास मदत करेल, सोबत लागू असेल तेथे सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटसह संबंधित स्क्रॅपेज कागदपत्रे देखील तयार करून देईल.
संघटित स्क्रॅपेजबद्दल जनजागृती आणि उपलब्धता सुधारून फोर्स मोटर्सचा वेईकल्सचे जबाबदारीने सेवेतून स्क्रॅपिंग करण्याच्या पद्धतींना पाठबळ देण्याचा आणि मौल्यवान ऑटोमोटिव्ह घटकांची पुनर्प्राप्ती करण्यात योगदान देण्याचा मनसुबा आहे.
या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत फोर्स मोटर्स लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. प्रसन फिरोदिया म्हणाले, “जबाबदार वेईकल उत्पादक म्हणून आमचा ठाम विश्वास आहे की, आमची भूमिका केवळ वेईकल्स तयार करणे आणि वितरित करण्यापुरती मर्यादित नाही. उपयुक्त आयुष्य संपल्यानंतर वेईकलचे व्यवस्थापन कसे केले जाते हेदेखील महत्त्वाचे ठरते. या उपक्रमाद्वारे आम्हाला जबाबदार स्क्रॅपेज आणि मौल्यवान घटकांच्या पुनर्वापराला प्रोत्साहन द्यायचे आहे. सोबत ग्राहकांना अधिकृत विल्हेवाट मार्गांची निवड करणे अधिक सुलभ बनवायचे आहे. साधनसंपत्तीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि वेईकलच्या संपूर्ण जीवनचक्रात अधिक जबाबदार पद्धतींना चालना देण्यासाठी आम्ही उचललेले हे आणखी एक व्यावहारिक पाऊल आहे.”
हा उपक्रम साधनसंपत्तीची कार्यक्षमता सुधारण्यावर आणि पर्यावरणावरील परिणाम कमी करण्यावर असलेल्या फोर्स मोटर्सच्या सातत्यपूर्ण लक्ष केंद्रित्वाशी संलग्न आहे. वापराचा कालावधी संपलेल्या वेईकल्सची जबाबदार विल्हेवाट आणि त्यातील पुनर्वापरयोग्य घटकांच्या पुनर्प्राप्तीला प्रोत्साहन देऊन कंपनीचा उद्देश आपल्या शाश्वत दृष्टिकोनाचा विस्तार उत्पादन प्रक्रियेच्या पलीकडे नेणे आणि वेईकलच्या संपूर्ण जीवनचक्रात अधिक जबाबदार पद्धतींना पाठबळ देणे हा आहे.





