पुणे : बालपणीची मैत्री, एकत्र व्यवसाय करण्याचे स्वप्न आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर प्रतीक आणि प्रणव या दोन मित्रांनी NJ Wealth सोबत म्युच्युअल फंड वितरण क्षेत्रात यशस्वी उद्योजकीय प्रवास घडवला आहे. आज त्यांच्या व्यवसायाद्वारे सुमारे १,३०० ग्राहकांची ₹१२८ ते ₹१३० कोटींची मालमत्ता व्यवस्थापनाखाली (AUM) असून, मासिक SIP व्यवसाय सुमारे ₹१.१३ कोटींचा आहे. ८ जानेवारी २०२६ रोजी त्यांनी ₹१०० कोटींचा टप्पा पार केला.
प्रतीकने २०१२ मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून तो CFA चार्टर्ड होल्डर आहे. त्याने बंगळुरू येथे Future Generali मध्ये काम केले होते. अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात असताना वडिलांचे निधन झाल्यानंतर कुटुंबाच्या आर्थिक आणि प्रशासकीय बाबी पूर्ण करताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या अनुभवातून सामान्य कुटुंबांना आर्थिक नियोजनाबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे, ही प्रेरणा त्याला मिळाली.
२०१६-१७ मध्ये आईजवळ राहण्यासाठी प्रतीकने नोकरी सोडून महाराष्ट्रात परतण्याचा निर्णय घेतला. त्याच काळात कॉग्निझंटमध्ये कार्यरत असलेला प्रणवही यूकेमधून भारतात परतला. २०१७ मध्ये Moneycontrol वरील NJ Wealth ची जाहिरात पाहून प्रतीकने पिंपरी-चिंचवड येथील कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर दोघांनी या व्यवसायाला सुरुवात केली.
NJ Wealth कडून त्यांना तंत्रज्ञान, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि व्यवसायासाठी आवश्यक व्यासपीठ मिळाले. सुरुवातीला ₹२,००० चे धनादेश गोळा करण्यासाठी त्यांना मोटारसायकलवरून ५० ते १०० किलोमीटर प्रवास करावा लागत असे. २०१८-१९ मधील मंदी आणि २०२० मध्ये AUM सहा कोटींवरून तीन कोटींवर घसरल्याने त्यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले. मात्र, त्यांनी प्रयत्न सुरू ठेवत Instagram वर दर आठवड्याला तीन व्हिडिओ पोस्ट करण्यास सुरुवात केली. परिणामी, डिसेंबर २०२३ मध्ये त्यांनी ₹५० कोटींचा टप्पा गाठला.
गुंतवणुकीपूर्वी तिचे महत्त्व समजावून सांगण्यावर त्यांचा भर असतो. त्यांच्या एका ग्राहकाने २०१८ मध्ये सुरू केलेली दरमहा ₹५,००० ची SIP बाजारातील प्रतिकूल परिस्थितीतही सुरू ठेवली. पुढे याच गुंतवणुकीतून त्याने मुलीच्या MIT पुणे येथील शिक्षणाचा खर्च भागवला.
सध्या त्यांच्या व्यवसायात दोन कर्मचारी कार्यरत आहेत. पुढील पाच वर्षांत ₹५०० ते ₹६०० कोटींची AUM गाठण्याबरोबरच स्वतःच्या अनुपस्थितीतही व्यवसाय सुरळीत चालेल, अशी सक्षम यंत्रणा उभारण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. सातत्य, ग्राहकांचा विश्वास आणि जिद्द यांच्या जोरावर त्यांनी यशस्वी उद्योजकीय भागीदारी उभी केली आहे.





