मुंबई, 14 मे 2026: भारतातील आघाडीच्या जनरल इन्शुरन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय जनरल इन्शुरन्सने आपल्या ‘चुनिये भरोसा, अपनों सा’ मोहिमेच्या पुढील भागात पंकज त्रिपाठी यांची प्रमुख भूमिका असलेल्या नवीन फिल्मची घोषणा केली. ही फिल्म आपल्या दैनंदिन जीवनात आणि या अनिश्चिततेच्या काळात आरोग्य विम्याची वाढती गरज अधोरेखित करते.
भारतामध्ये जीवनशैलीशी संबंधित आरोग्य समस्यांमध्ये आणि वैद्यकीय महागाईमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत कुटुंबांवरील आर्थिक भार वाढत आहे. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसच्या (NSO) 80व्या फेरीतील आरोग्य सर्वेक्षणाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अलीकडील सरकारी आकडेवारीनुसार देशातील रुग्णालयात दाखल होण्याच्या सरासरी खर्चामुळे आता कुटुंबांना 34,000 रु. पेक्षा जास्त खर्च स्वतःच्या खिशातून करावा लागत आहे. यातून आरोग्य विमा संरक्षण वाढत असूनही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे कुटुंबांवर निर्माण होणारा मोठा आर्थिक ताण दिसून येत आहे.
पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिकेसह ही फिल्म रोजच्या जगण्यातील वास्तवावर आधारित आहे. यात रोजची धावपळ, लांबचा प्रवास, तणावपूर्ण कामाचे दिवस आणि कुटुंबासाठी चांगले भविष्य सुरक्षित करण्यासाठी लोक करत असलेल्या त्यागाचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. आपल्या प्रियजनांसाठी अथक परिश्रम करत असताना आपल्या कुटुंबाच्या आरोग्य आणि आर्थिक कल्याणाचे संरक्षण करणे आणि सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींचे भविष्य सुरक्षित करणे या महत्त्वाच्या गोष्टीकडे अनेकदा दुर्लक्ष होते. भावनिक आणि सहज, सुसंगत वाटेल अशा कथनाद्वारे ही फिल्म प्रेक्षकांना ही गोष्ट लक्षात आणून देते. ही जाहिरात मोहीम अनिश्चिततेच्या काळात विश्वासार्ह आणि पुरेसा आरोग्य विमा निवडण्याचे महत्त्व अधोरेखित करते.
याबाबत बोलताना एसबीआय जनरल इन्शुरन्सचे मार्केटिंग आणि सीएसआर प्रमुख रथीन लाहिरी म्हणाले, “आजच्या काळात आरोग्याशी सबंधित संकटाचा मुकाबला करण्यासाठी तयार असणे म्हणजे केवळ विमा पॉलिसी असणे एवढेच नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्या असलेल्या पगारदार व्यक्तींसाठी बदलत्या आरोग्य गरजा आणि वाढत्या वैद्यकीय खर्चाचा सामना करण्याकरता वार्षिक उत्पन्नाच्या किमान 2% रक्कम विम्यासाठी राखून ठेवणे हा एक शहाणपणाचा निर्णय ठरू शकतो. पंकज त्रिपाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून असलेल्या आमच्या ‘चुनिये भरोसा, अपनों सा’ मोहिमेद्वारे आम्हाला लोक त्यांच्या प्रियजनांसाठी करत असलेल्या दैनंदिन प्रयत्नांचे प्रतिबिंब दाखवायचे होते. तसेच त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्य आणि आर्थिक स्वास्थ्य संरक्षणासाठी अधिक सक्रिय दृष्टिकोन स्वीकारण्यास प्रोत्साहित करायचे होते. ही मोहीम अनिश्चिततेच्या काळात कुटुंबांना खऱ्या अर्थाने आधार देणारे विमा संरक्षण निवडण्याचे महत्त्व अधोरेखित करते.”
आजच्या काळात आरोग्य विमा हा केवळ आपत्कालीन आर्थिक सहाय्यापुरता मर्यादित न राहता, कुटुंबांसाठी दीर्घकालीन आरोग्यसेवा आणि आर्थिकदृष्ट्या सज्ज असण्याच्या तयारीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनत आहे. पुरेशा आरोग्य विमा संरक्षणाद्वारे आगाऊ नियोजन केल्यास वैद्यकीय अनिश्चित परिस्थितींना अधिक आत्मविश्वासाने सामोरे जाण्यास आणि आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक ताण कमी करण्यास कुटुंबांना मदत होऊ शकते.
एसबीआय जनरल इन्शुरन्स व्यक्ती आणि कुटुंबांना सर्वसमावेशक कव्हरेज आणि लवचिक लाभांसह सहाय्य करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या ग्राहक-केंद्रित आरोग्य विमा उपाययोजना सादर करत आले आहेत. नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या हेल्थ अल्फा प्लॅनमध्ये ग्राहकांना त्यांच्या बदलत्या आरोग्य गरजांनुसार संरक्षण निवडण्यास मदत करण्यासाठी सानुकूलित कव्हरेज पर्याय, विस्तृत रुग्णालय नेटवर्कमध्ये कॅशलेस हॉस्पिटलायझेशन, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा लाभ, आधुनिक उपचारांसाठी कव्हरेज आणि विनाअडथळा क्लेम सहाय्य यांचा समावेश आहे.





