राष्ट्रीय, ११ जुलै, २०२४: टाटा समूहातील एक ब्रँड, तनाएराने ‘गूंज‘च्या सहयोगाने ‘एक्स्चेंज, एलिवेट अँड एम्पॉवर‘ हा नवीन उपक्रम सुरु केला आहे. १० जुलैपासून सुरु करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमामध्ये ग्राहकांना त्यांच्या जपून ठेवलेल्या साड्या विकासकार्यासाठी योगदान म्हणून देऊन नवीन मर्चन्डाईजवर आकर्षक ऑफर्सचा लाभ मिळवता येईल. ग्राहकांनी दिलेल्या साड्या ‘गूंज‘ संस्था ग्रामीण भारतातील महिलांना विकासकार्यात सहभागी होऊन त्यांच्या स्वतःच्या स्थानिक विकासाशी संबंधित समस्या सोडवल्याबद्दल बक्षीस म्हणून देईल.
ग्राहकांना पर्यावरणपूरक, शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करता यावा आणि जबाबदारीचे भान राखून जगता यावे यासाठी सक्षम बनवणाऱ्या नाविन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित हा उपक्रम आहे. त्याचवेळी त्यांना साड्यांच्या अनेक उत्तमोत्तम प्रकारांमधून आपली आवड निवडण्याची सुवर्णसंधी देखील यामध्ये दिली जात आहे. बरीच वर्षे अतिशय आवडीने वापरलेल्या, नीट जपून ठेवलेल्या, अनेक आठवणी व सांस्कृतिक संदर्भ असलेल्या साड्या सामाजिक कल्याणाच्या कार्यात योगदान म्हणून द्याव्यात व त्या साड्यांचे महत्त्व द्विगुणित करावे, त्याबदल्यात आकर्षक ऑफर्सचा लाभ घ्यावा असे आवाहन या उपक्रमामध्ये करण्यात आले आहे. योगदान दिलेल्या प्रत्येक तनाएरा ब्रँड आपल्या ग्राहकांना नवीन उत्पादनांवर १०% सूट कूपन देत आहे. या ऑफर्स तनाएराच्या ऑनलाईन स्टोरवर देखील रिडीम करता येतील. सर्वोत्कृष्ट भारतीय विणकाम परंपरांचा अनुभव एकाच ठिकाणी घेण्याची ही एक उत्तम संधी आहे. तनाएरामध्ये विविध प्रकारच्या एकापेक्षा एक सरस साड्या उपलब्ध आहेत, प्युअर सिल्क व कॉटन इकत, चंदेरी, संबळपूरी, टसर, बनारसी, कांजीवरम, साऊथ सिल्क, जमदानी, वेगन कलेक्शन्स आणि महेश्वरी अशा विविध प्रकारांची नवनवीन डिझाइन्स त्यांच्याकडे आहेत. तनाएराच्या वैविध्यपूर्ण, विशाल कलेक्शनमधून ग्राहक आपली आवड निवडू शकतात व जुन्या साड्या एक्स्चेंज करू शकतात.
या उपक्रमामध्ये सहभागी होऊन तुम्ही तुमचा जुना वॉर्डरोब अपग्रेड करू शकाल, इतकेच नव्हे तर समाजाचे ऋण फेडल्याचे समाधान मिळवण्याची अतिशय आगळीवेगळी संधी तुम्हाला यामध्ये मिळेल. ग्राहकांकडून जमा केलेल्या साड्या गूंज या संस्थेकडे सुपूर्द केल्या जातील. शहरी भागातील अतिरिक्त वस्तू ग्रामीण समुदायांना सक्रिय व सक्षम करण्यासाठी नाविन्यपूर्ण संसाधन म्हणून वापरण्यासाठी गूंज प्रसिद्ध आहे. महानगरांमधील प्रोसेसिंग सेंटर्समध्ये गूंजची टीम या साड्यांचे अतिशय बारकाईने निरीक्षण करेल व त्यांना स्वच्छ करून, त्यांची आवश्यक दुरुस्ती करेल. अशाप्रकारे या साड्या ग्रामीण भागांमध्ये पोहोचवण्यापूर्वी त्यांचे नूतनीकरण केले जाईल. सहजपणे परिधान न करता येण्यासारख्या साड्या देखील ते उपयोगात आणण्याजोग्या बनवतात. उदाहरणार्थ, काही हेवी साड्या गूंजच्या ग्रामीण कुटुंबांसाठी तयार केल्या जाणाऱ्या वेडिंग किट्समध्ये समाविष्ट केल्या जातात. लग्नाच्या दिवशी प्रत्येक मुलीची स्वप्ने पूर्ण व्हावीत या उद्देशाने ही वेडिंग किट्स तयार केली जातात. शहरी भागांमध्ये अतिरिक्त असलेल्या वस्तू ग्रामीण भागातील विकासासाठी वापरण्याचा गूंजचा सर्वसमावेशक दृष्टिकोन ग्राहकांना भारताच्या गावांमधील समृद्ध सांस्कृतिक परंपरा जतन करत असताना, जबाबदारीचे भान राखून उपभोग घेण्यासाठी तसेच एका विचारपूर्वक राबवल्या जाणाऱ्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.
तनाएराचे सीईओ श्री अंबुज नारायण यांनी या उपक्रमाविषयी आनंद व्यक्त करताना सांगितले, “एक्स्चेंज, एलिवेट अँड एम्पॉवर उपक्रमासाठी गूंजसोबत सहयोग करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे. अतिशय विचारपूर्वक सुरु करण्यात आलेला हा कार्यक्रम भारताची समृद्ध परंपरा जतन करण्याप्रती आमच्या वचनबद्धतेला अनुसरून चालवला जात आहे. आमच्या चोखंदळ ग्राहकांसाठी तनाएरामध्ये विशेष तयार करण्यात आलेल्या साड्यांचे विशाल कलेक्शन प्रस्तुत करण्यात आले आहे. भारतातील विविध भागांमधील सर्वोत्तम आणि अतिशय प्रसिद्ध विणकाम प्रकार यामध्ये आहेत. साडी एक्स्चेंजची सुविधा उपलब्ध करवून आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांचा वॉर्डरोब नवा करण्याची अभिनव आणि समाजोपयोगी पद्धत देत आहोत, इतकेच नव्हे तर ग्रामीण समुदायांच्या सक्षमतेच्या चक्रामध्ये देखील योगदान देत आहोत. हा उपक्रम एक सकारात्मक प्रभाव निर्माण करेल, त्यासोबतच टेक्स्टाईल परंपरांचे अभिनव पद्धतीने जतन देखील करेल.”
गूंजचे संस्थापक श्री. अंशू गुप्ता यांनी सांगितले, “सुटकेसेस आणि वॉर्डरोब्समध्ये पडून राहिलेल्या साड्या समाजोपयोगी कार्यासाठी योगदान म्हणून देण्याची अनोखी संधी शहरी भारतातील महिलांना देण्यासाठी तनाएराने गूंजसोबत सहयोग केला आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आज शहरी भागातील महिला विविध प्रकारच्या साड्या परिधान करतात, तर ग्रामीण भागांमध्ये आजही बहुतेक महिला रोजच्या रोज साडीच नेसतात. त्यांच्यासाठी साडी हा त्यांच्या सन्मानाचा आणि रोजच्या जगण्याचा एक भाग आहे. ‘क्लॉथ फॉर वर्क‘ या आमच्या उपक्रमामध्ये ग्रामीण महिला त्यांच्या स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी काम करतात व त्यांना बक्षीस म्हणून साड्यांची किट्स मिळतात. त्यांचा आनंद हे त्यांच्या कामाचे सर्वोत्तम बक्षीस असते. मला आशा आहे की इतर अनेक संस्था या सहयोगापासून प्रेरणा घेऊन शहरी व ग्रामीण भारतातील संसाधनांमधील दरी बुजवण्यासाठी आमच्याप्रमाणेच काम करू लागतील.”
सणासुदीचे दिवस जवळ येत आहेत. त्यानिमित्ताने आपल्या जतन केलेल्या साड्या एक्स्चेंज करून नवीन उत्तमोत्तम साड्या खरेदी करून वॉर्डरोब नवा करण्याची संधी घ्यावी असे आवाहन तनाएरा ब्रँडने केले आहे. या प्रभावी उपक्रमात साथ देऊन ग्रामीण समुदायाला सक्षम करण्याच्या कार्यात नक्की योगदान द्या.