“नखरा परंपरेचा” हा फॅशन शो ३१ मे रोजी पार पडणार

वाराही एज्युकेशनल अकॅडमी यांच्यावतीने “नखरा परंपरेचा” हा फॅशन शोचे आयोजन येत्या शुक्रवारी ३१ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजता महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी येथे मोठ्या दिमागत पार पडणार आहे. सदरील शो हा पारंपारिक कपड्यांच्या रंगसंगतीत आखलेला असून यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लहान मुले, मुली, तरूण व तरुणी आणि तृतीयपंथी देखील सहभागी होणार आहेत. अशी माहिती  श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शोच्या आयोजक हेमा लाळगे – गावडे यांनी दिली. या प्रसंगी प्रियांका दबडे, वर्षा शिंदे, जया देशमाने, रुपाली शिंदे, तेजास्वनी पायगुडे, नेत्रा नागपूरे, अर्चना गोजमगुंडे उपस्थित होते. 

या फॅशन शोच्या माध्यमातून स्पर्धकांना त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजन केले असून स्पर्धकांना त्यांची कला या ठिकाणी सादर करण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तृतीय पंथी सहभागी होणार आहेत. तर या कार्यक्रमासाठी विषेशतः पोलीस आयुक्त आर. राजा, उपायुक्त अश्विनी राख, डॉ. शंतनू जगदाळे, वास्तुशास्त्रज्ञ सुहास के, आकाश जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

वाराही एज्युकेशनल अकॅडमी गेल्या ११ वर्षांपासून हडपसर येथे कार्यरत असून या ठिकाणी पंतप्रधान मोदी, प्रमोद महाजन यांच्या नावाने सुरू असलेल्या सरकारी शैक्षणिक योजनांतर्गत विविध प्रकारचे कोर्सेस मोफत राबविले जातात. शिक्षण घेणाऱ्यांची ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे पण शिक्षणाची आवड आहे. अशा मुलांना, मुलींना व महिलांना व्यावसायिक द्रुष्टीने सक्षम बनविण्यासाठी हे उपक्रम तसेच फॅशन डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, एम एस औफिस, टैली, असे अनेक कोर्सेस शिकविले जातात.

फोटोओळ – डावीकडून प्रियांका दबडे, वर्षा शिंदे, जया देशमाने, रुपाली शिंदे, तेजास्वनी पायगुडे, नेत्रा नागपूरे, अर्चना गोजमगुंडे