पुणे: इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुप तसेच हडपसर विभाग संविधान गट तर्फे गुरुवार , दि.२३ मे रोजी बुद्ध जयंती उत्सव साजरा करण्यात आला.बुद्ध पौर्णिमा हि तथागत गौतम बुद्ध यांची जयंती असल्याने सर्वधर्मसमभाव जपण्याच्या उद्देशाने हा उपक्रम एकत्रित पणे साजरा करण्यात आला.असलम इसाक बागवान यांनी स्वागत केले.भैरवनाथ मंदिर समोर (लोणकर स्मशानभूमी द्वार) कोंढवा येथे ‘एक गाव, एक उत्सव’ या धारणेने दुपारी १ वाजता हा कार्यक्रम झाला.
बाल गटा कडून बौध्द वंदनेने या कार्यक्रमास सूरूवात करण्यात आली .उपस्थीतापैकी असलम इसाक बागवान, आशा भोसले, कांचन बलनाईके, वीणा कदम ,अहमद शेख यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या धम्माची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा भोसले यांनी केले ,ढावरे यांनी आभार मानले.भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस सर्व उपस्थितांनी पुष्प अर्पण केले.
या कार्यक्रमास कोंढवा गावातील डॉ सूर्यवंशी ,अशोक गायकवाड,अब्बास शेख,विनित,राकेश नि़दानिया, सचिन खिलारे,गौसीया शेख,सोहेल खान,महिला वर्ग तसेच सफाई कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमास शंभरहून अधिक नागरीक सहभागी होते.येथून पुढे कुठल्याही सामुदायिक कार्यक्रमात,साऊंड -डिजे लावणार नाही,नाचगाणी करणार नाही ,ध्वनी प्रदुषण करणार नाही, वाहतूकीला अडथळा करणार नाही,सर्व भारतीयांना आपले बंधू आणि भगिनी समजून देशात एकता, बंधूता, समानता आणू, अशी शपथ घेवून कार्यक्रमाची सांगता केली.