प्रतिनिधी – मानस, पुणे : जागतिक स्तरावरील प्रसिद्ध परिधान ब्रँड ‘युनिक्लो’ (UNIQLO) आपले नवीन स्टोअर पुण्यातील फिनिक्स मार्केटसिटी येथे १५ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सुरू करणार आहे.
फिनिक्स मार्केटसिटीमधील हे नवे स्टोअर सुमारे २१ हजार चौरस फूट क्षेत्रफळात उभारण्यात आले असून, पुरुष, महिला आणि मुलांसाठी ‘लाइफवेअर’ (LifeWear) संकल्पनेवर आधारित संपूर्ण कपड्यांची श्रेणी येथे उपलब्ध असणार आहे. साधेपणा, गुणवत्ता आणि उपयुक्तता या वैशिष्ट्यांवर आधारित खरेदीचा आधुनिक अनुभव पुणेकरांना देण्याचा कंपनीचा उद्देश आहे.
या नव्या स्टोअरमुळे फिनिक्स मार्केटसिटी पुण्याच्या आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँडच्या पोर्टफोलिओमध्ये आणखी भर पडणार असून, शहरातील प्रमुख लाइफस्टाइल आणि शॉपिंग डेस्टिनेशन म्हणून त्याचे स्थान अधिक मजबूत होणार आहे.
भारतात दर्जेदार आणि दैनंदिन वापरासाठी उपयुक्त कपड्यांना वाढती पसंती मिळत असल्याने ‘युनिक्लो’ने देशातील विविध शहरांमध्ये विस्तार सुरू ठेवला आहे. ‘दररोजचे जीवन अधिक सोपे आणि चांगले करणारे कपडे’ ही कंपनीची ‘लाइफवेअर’ संकल्पना ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जात आहे.
फिनिक्स पुणे मॉल्सचे वरिष्ठ केंद्र संचालक अंशुमन भारद्वाज म्हणाले, “फिनिक्स मार्केटसिटी पुणे येथे जागतिक दर्जाचे ब्रँड आणि उत्कृष्ट खरेदी अनुभव देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. ‘युनिक्लो’चे आगमन हे आमच्या आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँडच्या यादीतील महत्त्वाचे पाऊल आहे. पुणेकर ग्राहक आता गुणवत्ता, कार्यक्षमतेसह जागतिक दर्जाच्या आधुनिक फॅशनला अधिक पसंती देत आहेत.”
नवीन स्टोअरमध्ये ‘युनिक्लो’ची आधुनिक रिटेल डिझाईन संकल्पना आणि आकर्षक दृश्य मांडणी पाहायला मिळणार असून, ग्राहकांना आधुनिक आणि सुलभ खरेदीचा अनुभव मिळणार आहे.
स्टोअर उद्घाटन तपशील :
- दिनांक : शुक्रवार, १५ मे २०२६
- वेळ : सकाळी ११ वाजता
- ठिकाण : युनिक्लो, फिनिक्स मार्केटसिटी, पुणे
फिनिक्स मार्केटसिटी पुणे हे शहरातील प्रमुख लाइफस्टाइल डेस्टिनेशन मानले जाते. जागतिक आणि भारतीय ब्रँड्स, विविध खाद्यपदार्थ, मनोरंजन आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे ते पुणेकरांच्या पसंतीचे ठिकाण बनले आहे.





