कलादालनाचे उद्घाटन व आर्टिस्ट माजी विद्यार्थी मेळावा; विद्यार्थी सहायक समितीमध्ये शनिवारी (ता. १६)

By: Editor_Manas

On: Tuesday, May 12, 2026 5:08 PM

Google News
Follow Us

पुणे: विद्यार्थी सहायक समितीच्या शिवाजी हौसिंग सोसायटीजवळील लजपतराय विद्यार्थी भवन येथे उभारण्यात आलेल्या कलादालनाचे उद्घाटन व कलाकार (आर्टिस्ट) माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी (ता. १६ मे) रोजी सकाळी १०.३० वाजता प्रसिद्ध चित्रकार मिलिंद मुळीक व ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. यासह समितीमध्ये राहून कलाविषयक शिक्षण घेतलेल्या आजवरच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा होणार आहे. 

रविवारी (ता. १७) सायंकाळी ५.३० वाजता चित्रकार विलास कुलकर्णी यांच्या जलरंग प्रात्यक्षिकांची अनुभूती कलाप्रेमींना घेता येणार आहे. समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर आदी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर या कलादालनात माजी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरणार असून, सर्व पुणेकरांना हे प्रदर्शन विनामूल्य पाहता येणार आहे, अशी माहिती संयोजकानी दिली आहे. तसेच समितीच्या कलाकार माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

Trupti Desai

July 15, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026

July 9, 2026