पुणे, ११ मे २०२६ : आशियामध्ये डान्स स्पोर्ट्सच्या विकासाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल उचलत वर्ल्ड फेडरेशन ऑफ ॲक्रोबॅटिक डान्सेस अँड डान्स स्पोर्ट्स (डब्ल्यूएफएडीएस) ने नॅशनल फेडरेशन ऑफ ॲक्रोबॅटिक्स अँड डान्स स्पोर्ट्स इंडिया यांच्या सहकार्याने ८ मे २०२६ रोजी नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे भारतात प्रथमच डब्ल्यूएफएडीएस एशियन चॅम्पियनशिप कप २०२६ चे आयोजन करण्यात आले.
या ऐतिहासिक उपक्रमामुळे भारतात मोठ्या स्तरावर एक्रोबॅटिक रॉक अँड रोल आणि एक्रो स्विंगसारख्या रोमांचक डान्स स्पोर्ट्सची सुरुवात झाली असून, क्रीडा कौशल्य आणि कलात्मक अभिव्यक्तीचा अप्रतिम संगम पाहायला मिळाला.
या स्पर्धेत उत्तराखंड, महाराष्ट्र, झारखंड, राजस्थान, चंदीगड, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशसह देशभरातील १२० हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता. तर कझाकस्तान, किर्गिझस्तान, रशिया, मंगोलिया, व्हिएतनाम, चीन आणि भारत यांसारख्या विविध देशांतील जवळपास १०० आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी भाग घेतला होता.





