मुंबई, मे 2026: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या एनपीसीआय भारत बिलपे लिमिटेडने (NBBL) ने, जसपेसोबत भागीदारी करून, बँकिंग कनेक्टसाठी एक स्विच सादर केला आहे. या प्लॅटफॉर्ममुळे बँकांचे सर्वसमावेशीकरण सोपे झाले आहे. ही नवीन सुविधा ॲप-आधारित नेट-बँकिंगचा प्रवास अधिक जलद, सोपा आणि सुरक्षित करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
सॉफ्टवेअर डेव्हलपर किट (SDK) सोबत, हा स्विच भागीदार स्तरावरील महत्त्वाच्या सुधारणा उपलब्ध करून देईल, ज्यामध्ये जोखीम आणि फसवणूक यंत्रणेसाठी नियोजनबद्ध डेटा वितरण आणि एनबीबीएलच्या बँकिंग कनेक्ट सेंट्रल स्विचकडे विनाअडथळा राउटिंग यांचा समावेश आहे.
या सहयोगाद्वारे सादर करण्यात आलेले एकीकृत एसडीके आणि स्विच हे खालील बाबी शक्य करतात:
- बँका आणि भागीदारांसाठी एकच इंटिग्रेशन लेयर
- ‘बँकिंग कनेक्ट सेंट्रल स्विच’कडे अखंड राऊंटिंग
- जोखीम आणि फसवणूक प्रतिबंधक प्रणालींसाठी सुस्पष्ट आणि सुव्यवस्थित डेटाचा पुरवठा
- जलद ऑनबोर्डिंग आणि सुलभ सर्वसमावेशक प्रक्रिया
बँकिंग कनेक्टची एकच, आंतरकार्यक्षम स्तर म्हणून काम करण्याची वाढती क्षमता या घडामोडीतून समोर येते. जो प्रमाणित, बँक-केंद्रित नेट बँकिंग कार्यपद्धतीला समर्थन देते. तसेच, या प्लॅटफॉर्मच्या पायाभूत सुविधांवर आधारित व्यापक परिसंस्थेसाठी भागीदार विस्तारक्षम, मूल्यवर्धित उपाययोजना कशा तयार करू शकतात, हे देखील यातून अधोरेखित होते.
एनबीबीएलच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, नूपुर चतुर्वेदी म्हणाल्या, “बँकिंग कनेक्टची संकल्पना ग्राहकांना एक सुधारित, सोपी आणि सहज वापरता येण्याजोगा नेट बँकिंग अनुभव देणारे एक समाधान म्हणून करण्यात आली होती. शिवाय, त्याचे ओपन आर्किटेक्चर बँका आणि भागीदारांना सहजतेने नवनिर्मिती करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते. जसपेचे एसडीके आणि स्विच लेयर हे दाखवतात की, उद्योगातील भागीदार बँकिंग कनेक्टचा उपयोग करून एकसंध आणि बँकेला प्राधान्य देणारा नेट बँकिंग अनुभव कसा देऊ शकतात. आमचा विश्वास आहे की, अशा सह-निर्मितीच्या प्रयत्नांमुळे आधुनिक, ॲप-आधारित पेमेंट अनुभवांचा स्वीकार अधिक वेगाने होईल आणि लाखो ग्राहकांसाठी बँकिंग कनेक्ट एक विश्वासार्ह तसेच भविष्यासाठी उत्तम पर्याय म्हणून अधिक मजबूत होईल.”
जसपेच्या सीओओ आणि सह-संस्थापक, शीतल लालवाणी म्हणाल्या, “बँका ज्या पद्धतीने नेट-बँकिंग सर्वसमावेशकतेकडे पाहतात, त्या पद्धतीमध्ये बँकिंग कनेक्ट नवीन क्रांती घडवून आणते आहे. या उत्क्रांतीचा एक भाग असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. एनबीबीएल सोबतचे हे सहकार्य, एका प्रमाणित उद्योग प्रोटोकॉलच्या आधारे, ग्राहकांना अखंड आणि सुरक्षित अनुभव प्रदान करण्याच्या आमच्या सामायिक वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. स्विचच्या माध्यमातून, संपूर्ण परिसंस्थेसाठी एक सुसंगत, विश्वासार्ह आणि ‘ॲप-केंद्रित‘ नेट-बँकिंग अनुभव निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
नेट बँकिंगमधील अनेक जुन्या आव्हानांना सामोरे जाणे हा बँकिंग कनेक्टचा उद्देश आहे, उदा. बँकांमधील विखुरलेले एकत्रीकरण, असमान सेटलमेंट आणि रिकन्सिलिएशन प्रक्रिया, लेगसी रिडायरेक्ट-आधारित वेब फ्लो आणि ग्राहक अनुभवावरील मर्यादित नियंत्रण. मानकीकरण, भागीदारांच्या नेतृत्वाखालील नावीन्य आणि इंटरऑपरेबल आर्किटेक्चरद्वारे, हा प्लॅटफॉर्म एक सुलभ एकत्रीकरण मॉडेल प्रदान करतो, जो विस्तारक्षम आहे आणि आधुनिक नेट बँकिंग इकोसिस्टमच्या अपेक्षांशी जोडलेला आहे.
बँकिंग कनेक्टच्या जोडीने इकोसिस्टम-नेतृत्वाखालील नावीन्य सक्षम करून, एनबीबीएल व्यापक इकोसिस्टम स्वीकृतीला प्रोत्साहन देत आहे आणि नेट बँकिंगला एक आधुनिक तसेच भविष्यासाठी सज्ज पेमेंट पर्याय म्हणून अधिक मजबूत करत आहे.




