वर्षातील सर्वात मोठं एंटरटेनमेंट डेब्यू – रोहित शर्मा सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया वर

By: Editor_Manas

On: Saturday, May 9, 2026 3:43 PM

Google News
Follow Us

मुंबई, 8 मे 2026: सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया (SPNI) प्रेक्षकांसाठी वर्ल्ड कप विजेता कर्णधार रोहित शर्मा घेऊन येत आहे. त्याच्या बहुप्रतिक्षित एंटरटेनमेंट डेब्यूची झलक देत सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया ने एक धमाल टीझर सादर केला आहे. या टीझरमधून एका ताज्या आणि रोमांचक सहकार्याची झलक दिसते, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि चर्चेचं वातावरण निर्माण झालं आहे.

“या टीझरमध्ये चाहत्यांची गर्दी रोहितभोवती उसळलेली दिसते, जिथे ते त्याला त्याची आयकॉनिक ओळ – ‘कोणीही गार्डनमध्ये फिरणार नाही’ – पुन्हा म्हणण्याची विनंती करताना दिसतात. मैदानावर सहजपणे बोललेली ही ओळ पॉप-कल्चरमध्ये व्हायरल झाल्याचा मजेशीर संदर्भ देत टीझरमध्ये त्या संवादाभोवतीची धूम दाखवली आहे. या वेड्या क्रेझवर प्रतिक्रिया देताना रोहित हसत म्हणतो, ‘दोन ओळी काय बोलल्या, इतकं व्हायरल झालं… आता माझा पूर्ण शो आला तर काय होईल?’

“हास्य, करिष्मा आणि उत्सुकतेने भरलेला हा हलकाफुलका टीझर सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया कडून वर्षातील सर्वात मोठ्या एंटरटेनमेंट डेब्यूची रंगतदार सुरुवात करतो. रोहित शर्मा आपल्या खास विनोदबुद्धी आणि सहज मोहक व्यक्तिमत्त्वासह स्क्रीनवर येत असल्याने प्रेक्षकांना सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्ह वर एक अनोखा एंटरटेनमेंट सोहळा पाहायला मिळणार आहे.”

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now