पुणे, फेब्रुवारी २०२६: कॉमिक कॉन इंडिया तर्फे आयोजित नुकत्याच पार पडलेल्या ‘कॉसप्ले 101’ कार्यशाळेला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.अशोक नगर येथील माऊजी द टाइम कॅफे येथे प्रत्यक्ष शिकण्याच्या अनुभवासाठी शहरातील पॉप-कल्चरप्रेमी एकत्र जमले होते. या उपक्रमात १२० हून अधिक क्रिएटर्स आणि चाहते सहभागी झाले होते. या कार्यशाळेमुळे कॉसप्ले कौशल्ये अधिक सुधारण्यात मदत झाली आणि पुण्यात वाढत असलेल्या फॅन कल्चरप्रती उत्साहाला अधिक चालना मिळाली. येत्या २१–२२ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या पुणे कॉमिक कॉनसाठी यामुळे उत्तम वातावरण तयार झाले.
दोन वेळा इंडियन चॅम्पियनशिप ऑफ कॉसप्ले विजेते अक्षय चुरी, प्रसिद्ध कॉस्ट्यूम व प्रॉप मेकर समीर शेख आणि अनुभवी कॉसप्लेअर नविता यांनी कार्यशाळेत सर्वाना मार्गदर्शन केले.








