या लॉन्चमध्ये मेकअप, परफ्यूम आणि टूल्स यांचा निवडक संग्रह सादर केला जात आहे, जो ट्रेंडमध्ये राहणारा, उच्च दर्जाचा आणि देशभरातील ग्राहकांसाठी सहज उपलब्ध आहे.
पुणे, सप्टेंबर २०२५: H&M’ ने भारतात पहिल्यांदाच H&M Beauty कॉन्सेप्ट लॉन्च केल्याची घोषणा केली आहे. फॅशन आणि होम या संकल्पनेच्या पलीकडे जाऊन ब्युटीद्वारे स्व-प्रकटीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी ही नवी ओळख सादर करण्यात आली आहे. हा खास कलेक्शन ट्रेंड-ड्रिव्हन, सर्वसमावेशक आणि सहज उपलब्ध आहे. पुण्यात हा संग्रह लेकशोर कोपा मॉल, फिनिक्स मार्केटसिटी, अमनोरा मॉल, वेस्टएंड मॉल आणि फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियम येथे उपलब्ध असेल.
“भारतामध्ये H&M Beauty कॉन्सेप्ट आणताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. हा लॉन्च आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो अधिक खास बनतो कारण आम्ही H&M इंडियाची १० वर्षे साजरी करत आहोत. हा आमचा फॅशन आणि ब्युटी सर्वांना अधिक सुलभ करण्याचा आणि देशभरातील अधिकाधिक फॅशनप्रेमींपर्यंत पोहोचण्याचा संकल्प दर्शवतो,” असे H&M इंडियाच्या डायरेक्टर Helena Kuylenstierna यांनी सांगितले.
ग्लोबल जनरल मॅनेजर,H&M Beauty, Cathrine Wigzell म्हणाल्या, “या महत्त्वाच्या टप्प्यावर पुढे जाताना, आम्ही अशा विविधतेने परिपूर्ण आणि उत्साही बाजारात H&M Beauty सादर करण्यास उत्सुक आहोत. आमचे ध्येय म्हणजे असे ठिकाण तयार करणे जिथे फॅशन आणि ब्युटी सहजपणे एकत्र येतात आणि ग्राहकांना ट्रेंड-फॉरवर्ड डिझाईन, गुणवत्ता आणि समावेशिता असलेली प्रेरणादायी लाईन-अप मिळेल. आम्हाला प्रत्येक ग्राहकाला, मग तो स्टोअरमध्ये खरेदी करत असो किंवा ऑनलाइन, स्वतःला व्यक्त करण्याची ताकद देणारा आणि ब्युटी मजेदार व सर्वांसाठी सहज उपलब्ध बनवणारा संपूर्ण लुक घेऊन जावा असे वाटते.”
किंमत: मेकअपची किंमत ₹७९९ पेक्षा कमी असून परफ्यूमची किंमत ₹१२९९ पासून सुरू होते. सर्व उत्पादने vegan आणि क्रुएल्टी-फ्री आहेत, ज्यामुळे ब्रँडचा टिकाऊ ब्युटीचा संकल्प अधिक मजबूत होतो.
उपलब्धता: H&M Beauty कॉन्सेप्ट २ ऑक्टोबर २०२५ पासून भारतातील सर्व H&M स्टोअर्समध्ये आणि hm.com वर ऑनलाइन उपलब्ध असेल.