अलेक्झांड्रा ब्रँड यांनी केले भारताच्या शाश्वत कृषी प्रगतीचे कौतुक  

By: Editor_Manas

On: Wednesday, March 4, 2026 3:48 PM

Google News
Follow Us

पुणे, 4 मार्च 2026 : पुण्याजवळील नारायणगाव येथे नुकतेच सिंजेंटा समूहाच्या ग्लोबल सस्टेनेबिलिटी लीडर व सस्टेनेबिलिटी, कॉर्पोरेट अफेयर्स आणि ट्रान्सफॉर्मेशन विभागाच्या कार्यकारी उपाध्यक्ष अलेक्झांड्रा ब्रँड यांनी भेट दिली. आपल्या भेटीदरम्यान ब्रँड यांनी शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामीण युवकांशी थेट संवाद साधला. हा संवाद सिंजेंटा इंडियाच्या वुई केअर स्टीवर्डशिप मोहिमेद्वारे सुरक्षित वापर पद्धतींना प्रोत्साहन देणे आणि आय राईज युवा कौशल्य विकास उपक्रमाद्वारे ग्रामीण क्षमतांना बळकटी देणे यावर केंद्रित होता. त्यांनी जबाबदार पीक संरक्षण पद्धती अधिक बळकट करण्याबरोबरच भविष्यासाठी सक्षम ग्रामीण प्रतिभेला घडविण्यासाठी सिंजेंटाची बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली. ब्रँड यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधत पीक संरक्षण उत्पादनांच्या सुरक्षित हाताळणी आणि जबाबदार वापराबाबत जागरूकता निर्माण केली.

भारतामध्ये शाश्वत विकास आणि हवामान-अनुकूल शेतीतील वाढत्या गतीचे कौतुक करत, अलेक्झांड्रा ब्रँड म्हणाल्या की, शाश्वत शेतीमध्ये जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आणि महत्त्वाकांक्षा दोन्ही भारताकडे आहे. हवामान-स्मार्ट कृषी पद्धतींच्या प्रगतीपासून ते नियोजित वेळेआधीच अपारंपरिक ऊर्जा क्षमतेची उद्दिष्टे साध्य करण्यापर्यंत भारताने केलेली प्रगती जबाबदार वाढीसाठी असलेली बांधिलकी दर्शवते. भारताचा व्यापक आकार, वैज्ञानिक क्षमता आणि नवोन्मेषावर वाढता भर यामुळे जागतिक स्तरावर शाश्वत शेतीचे भविष्य घडविण्यात भारताला अनन्यसाधारण स्थान प्राप्त झाले आहे, असे ब्रँड यांनी सांगितले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

August 20, 2026

August 14, 2026

August 14, 2026

August 13, 2026

August 13, 2026

August 13, 2026