हसतखेळत पुणेकरांनी घेतला योग सवयीचा धडा

By: Editor_Manas

On: Wednesday, March 4, 2026 3:35 PM

Google News
Follow Us

पुणे, ४ मार्च २०२६ : रोटरी पुणे प्रिस्टिन यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध योगगुरू सौरभ बोथरा यांचा ‘परिवर्तन पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. रोटरी प्रांतपाल संतोष मराठे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून मानपत्र प्रदान करण्यात आले.

यानंतर झालेल्या योगसत्रात सौरभ बोथरा यांनी दररोज योग किंवा व्यायाम करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “सुरुवातीला किती वेळ किंवा किती कठीण व्यायाम करता यापेक्षा तो नियमितपणे करता का हे अधिक महत्त्वाचे आहे. एकदा सवय लागली की शरीराची ताकद, लवचिकता आणि कौशल्य आपोआप वाढते. त्यामुळे शारीरिकच नव्हे तर मानसिक स्वास्थ्यही सुधारते,” असे त्यांनी सांगितले.

सुमारे दीड तास चाललेल्या या कार्यक्रमात चार हजारांहून अधिक उपस्थितांना त्यांनी उत्साही योगसत्रातून मंत्रमुग्ध केले. व्यासपीठावर त्यांच्यासोबत योग करणारी तीन वर्षांची चिमुकली आणि दोन ज्येष्ठ नागरिक यांमुळे व्यायामासाठी वय अडथळा नसून इच्छाशक्ती आणि सवय महत्त्वाची असल्याचा संदेश मिळाला.

पुरस्काराची पार्श्वभूमी सांगताना कार्यक्रमाचे निमंत्रक रोटेरियन सुदिन आपटे म्हणाले की, सौरभ बोथरा यांनी योग आणि सहज व्यायाम सर्वांसाठी सुलभ केला आहे. शारीरिक लवचिकता नसलेले, आजाराने त्रस्त असलेले किंवा वयस्कर लोकदेखील सहज शिकू शकतील अशी योगशिक्षण पद्धती त्यांनी विकसित केली आहे. तसेच कोठूनही आणि केव्हाही शिकता येईल अशी ऑनलाइन सोय, माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, माफक शुल्क आणि बोथरा यांचे संवादकौशल्य यामुळे त्यांच्या उपक्रमाला मोठे यश मिळाले आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोटरी प्रिस्टिनच्या अध्यक्षा सुनया आपटे यांनी संस्थेच्या आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील उपक्रमांची माहिती दिली, तर नियोजित अध्यक्ष देवेंद्र सारळकर यांनी आभार प्रदर्शन केले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

September 26, 2026

September 24, 2026

September 23, 2026

September 22, 2026

September 20, 2026

September 16, 2026