तुला पाहताना…’ मनाला भिडणारी प्रेमाची रेशीमधून विणलेली मेलडी सादर

By: Editor_Manas

On: Wednesday, March 4, 2026 3:25 PM

Google News
Follow Us

पुणे : गायक व संगीतकार केदार गणेश अभ्यंकर (उपाख्य गणेशसुत) यांच्या ‘तुला पाहताना…’ या नव्या कोऱ्या मेलडीच्या रौप्यमहोत्सवी प्रयोगानिमित्त गीतांच्या पुस्तिकेचे प्रकाशन उत्साहात पार पडले. पौॲड्स क्रिएशनतर्फे आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका व संगीत शिक्षिका स्मिता जोशी यांच्या हस्ते पुस्तिकेचे अनावरण  करण्यात आले.

यावेळी प्राचार्य उज्ज्वला अंधारे, कवी रास उपाख्य डॉ. रामकृष्ण सहस्रबुद्धे तसेच ज्येष्ठ साहित्यिक अविनाश बागडे यांनी मार्गदर्शन केले. अनेक कवी-साहित्यिक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कवी रास यांनी गणेशसुत यांच्या नव्या गीतांना रसिकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नांचे कौतुक करत सर्वांनी या कार्याला पाठबळ द्यावे, असे आवाहन केले. अविनाश बागडे यांनी पूर्वी थिएटरबाहेर वितरित होणाऱ्या गाण्यांच्या पुस्तकांची आठवण सांगत इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचे समाधान व्यक्त केले.

स्मिता जोशी यांनी २५ व्या प्रयोगापर्यंत पोहोचणे ही सोपी गोष्ट नसल्याचे नमूद करत गणेशसुत यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांचे कौतुक केले. मार्चमध्ये होणाऱ्या रौप्यमहोत्सवी प्रयोगाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

September 26, 2026

September 24, 2026

September 23, 2026

September 22, 2026

September 20, 2026

September 16, 2026