पुणे : भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळा मोठ्या उत्साहात व शांततेमध्ये सुमारे 25 लाख अनुयायांच्या उपस्थितीत पार पडला आहे. यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणारे जिल्हा प्रशासन व भिमनअनुयायी यांचे भीमा कोरेगाव विजयस्तंभ शहर दिन समन्वय समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहे.
1818 च्या कोरेगाव भीमा लढ्यामध्ये शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ पेरणे येथे उभारण्यात आलेल्या जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लक्षावधी आंबेडकरी अनुयायी दरवर्षी येत असतात. यावर्षी महाराष्ट्रासह देशभरातील विविध भागातून आलेल्या तब्बल 25 लाख अनुयायांनी अभिवादन करून आपल्या पूर्वजां प्रतिकृतीचा व्यक्त केली केली. सकाळी सहा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे पालकमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन सोहळ्यास सुरुवात केली.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे , भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर , शिवसेना उपनेते सुषमा अंधारे , आमदार बापू पठारे , आमदार माऊली कटके , आमदार प्रकाश गजभिये , अनुसूचित जाती आयोगाचीॲड. गोरक्षनाथ लोखंडे , भारतीय दलित कोब्राचे ॲड. भाई विवेक चव्हाण , रिपब्लिकन युवा मोर्चाच्या सुवर्णा डंबाळे , रणस्तंभ सेवा समितीचे सर्जेराव वाघमारे ॲ विवेक बनसोडे , युवराज बनसोडे यांचे सह विविध पक्ष संघटनातील मान्यवरांनी अभिवादन केले.
महार सैनिकांची मानवंदना
महार रेजिमेंट मधून निवृत्त झालेल्या यशसिद्धी आजी-माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून सुमारे 3000 निवृत्त महार सैनिकांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे प्रमुख उपस्थितीत विजयस्तंभाला सकाळी नऊ वाजता मानवंदना दिली. यावेळी पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा व पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांचे सह बार्टी महासंचालक सुनील वारे , शौर्यदिन समन्वय समितीचे राहुल डंबाळे यांचेसह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्तांनी अनुयायांना शौर्य दिनाच्या शुभेच्छा देत हा उत्सव शांततेत व उत्साहात पार पडत असल्याबद्दल आभार व्यक्त केले.
सुविधांमुळे नागरिकांमध्ये समाधान
विजयस्तंभ परिसरामध्ये बार्टी , जिल्हा परिषदेलह विविध विभागांनी उभारलेल्या सुविधांमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण जाणवत होते, विशेषता जिल्हा परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या आरोग्य कक्ष व हिरकणी कक्षाचा लाभ घेणाऱ्या महिला व नागरिकांनी या ठिकाणी देण्यात आलेल्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केले.
सभांद्वारे अभिवादन
रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांची दुपारी १२ वा. सभा पार पडली तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या स्टेजवरून भीमराव आंबेडकर यांची देखील दुपारी दिड वाजता सभा झाली. शौर्यदिन समन्वय समितीच्या वतिनी घेण्यात आलेल्या सभेत विजयस्तंभ स्मारकाचे काम त्वरीत सुरू करावे अशी आग्रही मागणी या ठिकाणी झालेल्या सभेतून राहुल डंबाळे व सुवर्णा डंबाळे यांनी केली.
विजयस्तंभ परिसरात भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीच्या वतीने नागरिकांसाठी आराम कक्ष उभारण्यात आला होता याचा सुमारे दोन हजार नागरिकांनी लाभ घेतला तसेच याच सभामंडपात महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर राजेंद्र कांबळे यांचा शाहिरी जलसा व भीमा कोरेगाव वरील पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याला नागरिकांनी तुफान प्रतिसाद दिला. या ठिकाणी गायक अमर पुणेकर यांनी भीमा कोरेगाव वरील भीमगीते गायन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली होती त्यांच्या समवेत ज्येष्ठ गायक आनंद शिंदे समर्थक शिंदे या शिंदे शाही कुटुंबीयांनी गाणी गायली.








