गतविजेत्या राउंड ग्लासची मोठ्या विजयासह धडाकेबाज सुरुवात

पुणे, ऑक्टोबर: म्हाळुंगे (बालेवाडी) येथील शिव छत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या नवव्या एसएनबीपी अखिल भारतीय (१६ वर्षाखालील मुले) हॉकी स्पर्धेत गतविजेत्या राउंड ग्लास अकादमीने त्यांच्या गटामध्ये प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून दमदार सुरुवात केली.

गुरुवारी, राउंड ग्लास अकादमीने क गटामध्ये वीर एच.ए संघाचा ११-० असा धुव्वा उडविला. त्यानंतर ड गटामध्ये बंगळुरूच्या आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनीने कोहिनूर एच.ए. संघाचा ७-३ असा पराभव केला.

राउंड ग्लास अकादमीकडून वरिंदर सिंगने (२’, १०’, २०’, २५’, ३८’) सर्वाधिक पाच गोल केले. त्याला राजभर कुणाल (३’), अर्जनदीप सिंग (१३’), अर्शप्रीत सिंग (३०’, ३६’, ४९’) आणि सॅम्युअल (४५’) यांची चांगली साथ लाभली. वीर एच.ए. संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. 

माजी विजेत्या आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनीने कोहिनूर एच.ए. विरुद्ध वर्चस्व राखले. पहिल्या क्वार्टरमध्ये अंकित बरुआ (४’, १३’) यांनी दोन आणि रमनने (१४’) आर्मी बॉईजला तीन गोलची आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात, अर्जुन (४८’, ५३’), मनीष मांझी (५२’) आणि नीरज बरवाने (५४’) त्यात भर घातली. कोहिनूर एच.ए.कडून नितीन कुमार (२९ मिनिटे), कबीर सिंग (५१ मिनिटे) आणि संग्रोहा हुनरने (५२ मिनिटे) गोल केले.

अ गटामध्ये, मुंबईच्या रिपब्लिकन स्पोर्ट्स क्लबने पहिल्या दिवशी हॉकी युनिट ऑफ तमिळनाडूविरुद्ध मोठ्या विजयाची नोंद केली. 

ई गटामध्ये झालेल्या एका रंगतदार सामन्यात, आर.के. रॉय अकादमीने नामजन हेमरोनच्या (५२ मिनिट) पेनल्टी कॉर्नरवरील गोलच्या जोरावर  यूटीएससी हॉकी अकादमीचा २-१ असा पराभव केला. वास्तविक पाहता चिराग कोटियनने (३०’) यूटीएससी हॉकी अकादमीला आघाडी मिळवून दिली. मात्र, तीन मिनिटांच्या फरकाने विनय कुमारने (३३’) आर.के. रॉय अकादमीला बरोबरी साधून दिली.

निकाल (दुसरा दिवस): 

अ गट: रिपब्लिकन स्पोर्ट्स क्लब: १० (विजकापे ज्ञानेशकुमार १०’, २८’, ५०’; फोआद शेख १६’, २३’, ३०’; हीथोबिबा चिंगशुभम १७’; मितांश राणे ४८’; अमोद घाडगे ८५’; दीपक यादव ५७’) विजयी वि. हॉकी युनिट ऑफ तामिळनाडू: १ (टी. नरेन ३३’). मध्यंतर: ६-०.

ड गट: आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनी: ७ (अर्कित बरुआ ४’, १३’; रमन १४’; अर्जुन ४८’, ५३’; मनीष मांझी ५२’; नीरज बरवा ५४’) विजयी वि. कोहिनूर H.A: ३ (Nitin Kumar 29’, Kabir Singh 51’, Sangroha Huner 52’). मध्यंतर: 3-1

क गट: राउंड ग्लास अकादमी: 11 (वरिंदर सिंग 2′, 10′, 20′, 25′, 38′; राजभर कुणाल 3′; अर्जनदीप सिंग 13′; अर्शप्रीत सिंग 30′, 36′, 49′; सॅम्युअल 45′) विजयी वि. वीर एच ए: 0. मध्यंतर: 7-0.

ई गट: आर.के. रॉय अकादमी: २ (विनय कुमार ३३’; नामजन हेमरोन ५२’) विजयी वि. यूटीएससी हॉकी अकादमी: १ (Chirag Kotian 30’). मध्यंतर: ०-१.

(बुधवार)

फ गट: स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गुजरात: १ (वाला अल्पेश ५५’) बरोबरी वि. जेएआय अकादमी: १ (निकलेहपाल राजेंद्र ४८’). मध्यंतर: 0-0.

ग गट : विजय एचए : १८ (राही राजाबाबू ५, ५९’, फरझान खान ११’; मलिक सुहेब १२’; राजभर शुभम १४’; कुमार यादव २३’, ३६’, ३८’; बिंद शंकर २७, ५६’; कुशवाह श्रेयांश ३१; शशांक कुमार ३२’; 33’, 34’; शिवमोहन यादव ४९; सक्षम यादव 55’; मलिक साहेब 59’, 60’) विजयी वि. ग्रासरूट हॉकी: 0. मध्यंतर: 6-0.