10 दशलक्ष पॉलिसी विकण्याचा मोठा आणि महत्त्वाचा टप्पा टर्टलमिंटने नुकताच गाठला

मुंबई, 11 जून,2024: भारतातील आघाडीचा विमा वितरण प्लॅटफॉर्म, टर्टलमिंटने आज एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. टर्टलमिंटने 1 कोटी (10 दशलक्ष) पॉलिसींची विक्री केली. पॉइंट ऑफ सेल पर्सन (POSP) मॉडेलची उपयोगिता दर्शवणारे हे यश आहे. तसेच देशभरात, विशेषत: टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्ये विम्याबद्दलची जागृती वाढवण्याबाबत टर्टलमिंटच्या अतूट वचनबद्धतेचा हा पुरावा आहे.

कंपनी सुरू झाल्यापासूनच टर्टलमिंटने सल्लागारांना तंत्रज्ञान सक्षम बनविण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या याच दृष्टिकोनामुळे देशभरातील 17,000 पिन कोडपर्यंत त्यांचा विस्तार झाला आहे. तसेच ज्यांनी अद्यापही विमा काढलेला नाही, अशा लोकांपर्यंत पोहोचणे त्यांना शक्य झाले. विशेष म्हणजे, टर्टलमिंटचा 60% हून अधिक व्यवसाय हा मेट्रो सिटीजपलीकडे पसरलेला आहे. त्याचा हा विस्तारच त्याचा प्रभाव दर्शवतो.

टर्टलमिंटचे सहसंस्थापक आणि सीईओ धीरेंद्र माह्यवंशी म्हणाले,“1 कोटी पॉलिसींचा हा टप्पा गाठणे आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद आहे. भारतातील प्रत्येकासाठी सुलभ आणि सर्वसामान्यांच्या आटोक्यातील विमा काढण्याच्या आमच्या अतूट बांधिलकीचा पुरावा म्हणजे हे यश. सल्लागारांना तंत्रज्ञानक्षम बनवून तसेच मजबूत वितरण नेटवर्कचा फायदा करून घेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे आमचे उद्दिष्ट असून देशाच्या शेवटच्या टोकापर्यंत विमा पोहोचवण्याचा आमचा मानस आहे.

अधिकाधिक प्रगतीवर लक्ष देत टर्टलमिंट जास्तीतजास्त सल्लागार ऑनबोर्ड असावेत यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच 1 दशलक्ष सल्लागारांचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य साध्य करण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहे. विद्यमान एजंटना समर्थन देण्यासोबतच कंपनी दीर्घकालीन आर्थिक स्थिरतेला प्राधान्य देते. विमा मूल्य शृंखलेत टर्टलमिंट काही न काही नवीन शोधत त्याचा फायदा ग्राहकांना कसा होईल, याकडे लक्ष देताना दिसते. टर्टलमिंटने केलेली 1 कोटी पॉलिसींची विक्री ही भारतासाठी विमा क्षेत्रातील एक मोठी उपलब्धी आहे. तंत्रज्ञानाचा फायदा करून घेत, धोरणात्मक भागीदारी आणि सल्लागारांना सक्षम बनवण्याची वचनबद्धता या सर्वांसह टर्टलमिंट भारतातील प्रत्येक माणसाला विमा मिळेल यासाठी प्रयत्नशील आहे.