महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापन दिन जळगावमध्ये उत्साहात साजरा

By: Editor_Manas

On: Monday, March 9, 2026 3:09 PM

Google News
Follow Us

जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापन दिन रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. त्याच औचित्य साधून जळगाव शहरातील औद्योगिक क्षेत्रातील सुप्रीम कॉलनी परिसरातील पोलीस कॉलनी येथे मनसे शाखेत वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी शाखेत फटाके फोडून आणि पेढे वाटून कार्यकर्त्यांनी जल्लोषात वर्धापन दिन साजरा केला. तसेच उद्यापासून या शाखेत सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. शाखाध्यक्ष युसुफ खाटीक यांच्या नेतृत्वाखाली शाखेतील पदाधिकारी सदस्य नोंदणी मोहिमेची सुरुवात करणार असून यासाठी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारीही शाखेला भेट देणार आहेत.

या सदस्य नोंदणी अभियानाला जळगाव शहर तसेच जिल्ह्यातील नागरिक, माता-भगिनी आणि तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले.

या कार्यक्रमाला उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, उपमहानगराध्यक्ष ललित शर्मा, विभाग अध्यक्ष राहुल चव्हाण, शाखाध्यक्ष युसुफ खाटीक, अशपाक शहा, बादशाहा शहा, दीपक माळी, मुज्जू बिस्ती, अली खाटीक, सोहेल पिंजारी, शोएब खाटीक, प्रदीप गायकवाड यांच्यासह मनसेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

Trupti Desai

July 15, 2026

July 14, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026