‘बीएनसीए’ मध्ये डिजिटल आर्किटेक्चरवरील ‘कॉन्टेक्स्टक्राफ्ट’ कार्यशाळा संपन्न

By: Editor_Manas

On: Monday, March 9, 2026 7:43 AM

Google News
Follow Us

पुणे, मार्च २०२६ : महार्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए), पुणे येथील डिजिटल आर्किटेक्चर विभागात ‘कॉन्टेक्स्टक्राफ्ट – व्हर्टिकल मॉर्फॉलॉजीज’ या तीन दिवसांच्या पॅरामेट्रिक डिझाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विविध शहरी संदर्भांमध्ये उंच इमारतींच्या रचना विकासावर आधारित या कार्यशाळेत पुणे परिसरातील सुमारे ५० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले.

या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना कम्प्युटेशनल डिझाइन थिंकिंगची ओळख करून देत पर्यावरणीय घटक, संदर्भ आणि कार्यक्षमतेचा विचार करून उभ्या स्वरूपातील वास्तुरचना विकसित करण्याचे कौशल्य शिकवणे हा होता. कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य आर्किटेक्ट अनुराग कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डिजिटल आर्किटेक्चर विभागाच्या प्रमुख आर्किटेक्ट धनश्री सरदेशपांडे यांच्या सहकार्याने पार पडली.

कार्यशाळेचे आयोजन व मार्गदर्शन असिस्टंट प्रोफेसर आर्किटेक्ट सुप्रिया घाडगे आणि असिस्टंट प्रोफेसर आर्किटेक्ट कौशिक सरदेसाई यांनी केले. विद्यार्थ्यांना अल्गोरिदम विकास, पर्यावरणीय विश्लेषण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित व्हिज्युअलायझेशन यांचा समन्वय असलेली आधुनिक डिझाइन प्रक्रिया शिकवण्यात आली.

रायनो आणि ग्रासहॉपर या सॉफ्टवेअर्सद्वारे डिजिटल मॉडेलिंग, डिझाइन लॉजिकची निर्मिती आणि अल्गोरिदम विकसित करण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकवण्यात आली. तसेच लेडीबग प्लगइनच्या साहाय्याने सूर्यप्रकाश, हवामान आणि इतर पर्यावरणीय घटकांचे विश्लेषण करून डिझाइनवर होणारा प्रभाव समजावून सांगण्यात आला.

कार्यशाळेदरम्यान आर्किटेक्ट नीरज महाजन (यूएनएस, ॲमस्टरडॅम) यांनी यूएनएसमधील प्रकल्पांबाबत तसेच रेफ्लाइज एआय रेंडरिंग वर्कफ्लो विषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.

बी.आर्च.च्या विविध वर्षांतील विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. तीन दिवसांत विद्यार्थ्यांनी डेटा-आधारित उंच इमारतींचे डिझाइन प्रस्ताव तयार केले आणि त्यांचे थ्री-डी प्रिंटिंगद्वारे भौतिक नमुने तयार करून कम्प्युटेशनल डिझाइन व फॅब्रिकेशन यातील दुवा प्रत्यक्ष अनुभवला.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 19, 2026

July 19, 2026

July 19, 2026

July 17, 2026

Trupti Desai

July 15, 2026

July 14, 2026