Big Update | हा बोगदा वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने खुला; 40 मिनिटांचा प्रवास आता फक्त 15 मिनिटांत

By: Editor_Pratik

On: Tuesday, May 20, 2025 7:35 AM

Kashedi Tunnel
Google News
Follow Us

Big Update | हा बोगदा वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने खुला; 40 मिनिटांचा प्रवास आता फक्त 15 मिनिटांत

मुंबई, 19 मे 2025 — उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दुसऱ्या बोगद्यात वीजपुरवठा सुरळीत सुरू झाल्याने आता दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत.]

Double Decker Flyover : पुण्यातील ‘या’ भागात तयार होणार डबल डेकर फ्लायओव्हर ! जून मध्ये होणार उद्घाटन

प्रवास होणार वेगवान आणि सुरक्षित

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड या दरम्यानचा कशेडी घाट हा अत्यंत वळणावळणाचा आणि वेळखाऊ मार्ग होता. मात्र, या नवीन बोगद्यामुळे 40-45 मिनिटांचा प्रवास आता अवघ्या 10-15 मिनिटांत शक्य झाला आहे.

BIG NEWS : कोरोनाचा नवा विषाणू किती खतरनाक? भारतात पुन्हा कोव्हिडची लाट येणार? आरोग्य तज्ज्ञांचं मोठं भाकीत

हा बोगदा सुमारे 2 किलोमीटर लांबीचा असून त्यास जोडणारा रस्ता एकूण 9 किलोमीटरचा आहे. वाहतुकीचा वेग वाढून, गाड्यांचा वेळ आणि इंधन दोन्हीची बचत होणार आहे.

वीजपुरवठा आणि सुरक्षा यंत्रणा पूर्णत्वास

BIG NEWS : राज्यातील मोठा राजकीय भूकंप? सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री, तर जयंत पाटील व रोहित पवार राज्यात मंत्री होणार?

15 मे रोजी बोगद्यात वीजपुरवठा सुरू झाला. त्यामुळे आता दोन्ही दिशांनी बोगदे प्रवाशांसाठी खुल्या झाले आहेत. बोगद्यांत दोन्ही बाजूंनी सुमारे 200 पथदीप बसवले जात असून, त्यापैकी बहुतांश काम पूर्ण झाले आहे.

Kashedi Tunnel

हा वीजपुरवठा आणि प्रकाश यंत्रणा प्रवासाला अधिक सुरक्षित आणि आरामदायक बनवणार आहे.

haniwar Wada Horror Story : “काका मला वाचवा” या आवाजामागील खरी कहाणी काय आहे?

गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दिलासा

सुट्टीच्या कालावधीत गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. अशा वेळी कशेडी घाट बायपास करणारा बोगदा प्रवासाच्या दृष्टीने ‘गेमचेंजर’ ठरणार आहे. चाकरमानी वर्ग, पर्यटक, आणि मालवाहतूकदार यांच्यासाठी हा बदल प्रचंड दिलासादायक ठरणार आहे.

सरतेशेवटी या बोगद्यातील वळणे टाळल्यामुळे अपघातांची शक्यता कमी झाली असून प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित व सोयीस्कर झाला आहे. महामार्ग प्राधिकरणाने केलेल्या या कामगिरीमुळे कोकणात जाणारा प्रवास अधिक आनंददायक होणार आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now