होळी (हुताशनी पौर्णिमा) सणामागील शास्त्र

By: Editor _2

On: Thursday, March 13, 2025 8:48 AM

Google News
Follow Us
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोदुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत् प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळीवृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्याद्वारे वातावरणाची शुद्धी करणेहा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे होळी सणाचे महत्त्वहा सण साजरा करण्याची पद्धत याविषयीची शास्त्रीय माहिती या लेखातून देण्याचा प्रयत्न केला आहे. 
 

होळी सणाची तिथी देशपरत्वे फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या 5 – 6 दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो.

होळी सणाला असलेले समानार्थी शब्द उत्तर भारतात याला होरीदोलायात्रातर गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांत शिमगाहोळीहुताशनी महोत्सव अन् होलिकादहन आणि दक्षिणेत कामदहन अशा संज्ञा आहेतबंगालमध्ये दौलायात्रा म्हणून होळीचा सण साजरा करतातयाला ‘वसंतोत्सव’ अथवा ‘वसंतागमनोत्सव’ म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनासाठी साजरा करायचा उत्सव हे नावही देता येईल.

होळी सणाचा इतिहास : (.) `पूर्वी ढुंढा किंवा ढौंढा नामक राक्षसी गावात शिरून लहान मुलांना पीडा द्यायचीती रोग निर्माण करायचीतिला गावाबाहेर हाकलून देण्याकरिता लोकांनी पुष्कळ प्रयत्न केलेपण ती जाईनाशेवटी लोकांनी बीभत्स शिव्याशाप देऊन आणि सर्वत्र अग्नी पेटवून तिला भिववले अन् पळवून लावलेत्यामुळे ती गावाबाहेर पळून गेली.’ असे भविष्योत्तरपुराणात म्हटले आहे.  

एकदा भगवान शंकर तपाचरणात गढले होतेते समाधी अवस्थेत असतांना मदनाने त्यांच्या अंतःकरणात प्रवेश केलातेव्हा ‘मला कोण चंचल करत आहे’असे म्हणून शंकराने डोळे उघडले आणि मदनाला पहाताक्षणीच जाळून टाकलेदक्षिणेतील लोक कामदेव दहनाप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करतातया दिवशी मदनाची प्रतिकृती करून तिचे दहन करतातया मदनाला जिंकण्याची क्षमता होळीत आहेम्हणून होळीचा उत्सव आहे.

फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या पृथ्वीवरील प्रथम महायज्ञाची स्मृती म्हणून प्रत्येक वर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी सर्व भारतात ‘होली’ या नावाने यज्ञ होऊ लागले.

 होळीचे महत्त्व (.) विकारांची होळी करून जीवनात आनंदाची उधळण करायला शिकवणारा सण : ‘होळी’ हा विकारांची होळी करण्याचा फाल्गुन मासातील सण आहे. ‘विकारांची जळमटे जाळून टाकून नवीन उत्साहाने सत्त्वगुणाकडे जाण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत’याचे जणू तो प्रतीकच आहेराहिलेला सूक्ष्मअहंकार हाही होळीतील अग्नीत नाहीसा होतोतो शुद्ध सात्त्विक होतोत्यानंतर रंगपंचमी आनंदाची उधळण करत येतेनाचतगात एकत्र येऊन जीवनाचा आनंद लुटायचाश्रीकृष्णराधा यांनी रंगपंचमीद्वारे सांगितले, ‘आनंदाची उधळण करा.’ असे  .पूपरशराम पांडे महाराज यांनी म्हटले आहे. 

होळी आपले दोषव्यसने आणि वाईट सवयी यांना घालवण्याची सुसंधी आहे.

होळी सद्‍गुण ग्रहण करण्याची /अंगिकारण्याची संधी आहे.

होळी उत्सव साजरा करण्याची पद्धत देशभरात सर्वत्र साजरा केला जाणार्‍या ‘होळी’ या सणात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण उत्साहाने सहभागी होतातहोळीची रचना करण्याची तिला सजवण्याची पद्धतीही स्थानपरत्वे पालटत असल्याचे सध्या पाहायला मिळते.              

सर्वसाधारणपणे ‘देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवायची असते. बहुधा ग्रामदेवतेसमोर होळी उभी केली जाते.श्री होलिकापूजनाचे स्थान शेणाने सारवून अन् रांगोळी घालून सुशोभित करतात. मधोमध एरंड, माड, पोफळी अथवा ऊस उभा करतात. त्याच्या भोवती गोवर्‍या आणि सुकी लाकडे रचतात. घरातील कर्त्या पुरुषाने शुचिर्भूत होऊन आणि देशकालाचा उच्चार करून ‘सकुटुम्बस्य मम ढुण्ढाराक्षसीप्रीत्यर्थं तत्पीडापरिहारार्थं होलिकापूजनमहं करिष्ये ।’ असा संकल्प करावा आणि नंतर पूजा करून नैवेद्य दाखवावा. त्यानंतर ‘होलिकायै नमः ।’ असे म्हणून होळी पेटवावी. होळी पेटल्यावर होळीला प्रदक्षिणा घालावी आणि पालथ्या हाताने बोंब मारावी. होळी पूर्ण जळल्यानंतर ती दूध अन् तूप शिंपडून शांत करावी. श्री होलिकादेवतेला पुरणपोळीचा नैवेद्य, तसेच नारळ अर्पण करावा. मग जमलेल्या लोकांना त्याचा प्रसाद द्यावा. नारळ, पपनस यांसारखी फळे वाटावीत. सारी रात्र नृत्यगायनात व्यतीत करावी.


होळीची पूजा अशी करावी…

प्रदीपानन्तरं च होलिकायै नमः इति मन्त्रेण पूजाद्रव्य-प्रक्षेकात्मकः होमः कार्यः । – स्मृतिकौस्तुभ

अर्थ : अग्नी प्रज्वलित केल्यावर ‘होलिकायै नमः’ या मंत्राने पूजाद्रव्ये वाहून होम करावा.

निशागमे तु पूज्येयं होलिका सर्वतोमुखैः । – पृथ्वीचंद्रोदय

अर्थ : रात्र झाल्यावर सर्वांनी होलिकेचे (वाळलेली लाकडे आणि गोवर्‍या रचून पेटवलेल्या अग्नीचे) पूजन करावे.

होलिकेची पूजा करतांना म्हणायचा मंत्र

 

अस्माभिर्भयसन्त्रस्तैः कृता त्वं होलिके यतः ।
अतस्त्वां पूजयिष्यामो भूते भूतिप्रदा भव ॥ – स्मृतिकौस्तुभ

 

अर्थ : हे होलिके (वाळलेली लाकडे आणि गोवर्‍या रचून पेटवलेल्या अग्ने), आम्ही भयग्रस्त झालो होतो; म्हणून आम्ही तुझी रचना केली. यामुळे आता आम्ही तुझी पूजा करतो. हे होळीच्या विभूती ! तू आम्हाला वैभव देणारी हो.

होळीच्या दुसर्‍या दिवशी करायच्या धार्मिक कृती

 

प्रवृत्ते मधुमासे तु प्रतिपत्सु विभूतये ।
कृत्वा चावश्यकार्याणि सन्तर्प्य पितृदेवताः ॥
वन्दयेत् होलिकाभूतिं सर्वदुष्टोपशान्तये । – स्मृतिकौस्तुभ

 

अर्थ : वसंत ऋतूतील पहिल्या प्रतिपदेला समृद्धी प्राप्त व्हावी, यासाठी सकाळी प्रातर्विधी आटोपून पितरांना तर्पण करावे. त्यानंतर सर्व दुष्ट शक्तींच्या शांतीसाठी होलिकेच्या विभूतीला वंदन करावे.

(काही पंचांगांनुसार फाल्गुन पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी येणार्‍या प्रतिपदेपासून वसंत ऋतूला आरंभ होतो.)

 होळीच्या दिवशीची ‘होलिका’ ही ‘होलिका’ राक्षसीण नव्हे !

भक्त प्रल्हादाला घेऊन आगीत बसलेली ‘होलिका’ ही राक्षसीण होतीहोळीच्या दिवशी म्हटल्या जाणार्‍या मंत्रांमध्ये जो ‘होलिका’ असा उल्लेख येतोतो फाल्गुन पौर्णिमेला उद्देशून आहेत्या राक्षसिणीला उद्देशून नव्हेफाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी लाकडे रचून होम करतातम्हणून त्या तिथीला होलिका म्हणतातअसे वरील श्‍लोकांत आलेच आहे.

आयुर्वेदानुसार होळीचे लाभ – थंडीच्या दिवसांत शरिरात साठलेला कफ दोष होळीच्या काळात सूर्याच्या उष्णतेमुळे पातळ होतो आणि त्याच्यामुळे विकार उत्पन्न होतातहोळीच्या औषधी धुरामुळे कफ न्यून होण्यास साहाय्य होतेसूर्याच्या उष्णतेमुळे पित्त काही प्रमाणात वाढतेगाणेहसणे आदींनी मन प्रसन्न होते आणि पित्त शांत होतेहोळीच्या वेळी म्हटलेल्या रक्षोघ्न मंत्रांनी वाईट शक्तींचा त्रासही न्यून होतो.’ असे वैद्य मेघराज माधव पराडकर,गोवा यांनी म्हटले आहे. 

होळीतील ‘बोंब मारणे’ या कृतीमागील शास्त्र –  हिंदूंचा एक पवित्र सण असलेल्या होळीच्या दिवशी होळी पेटवल्यानंतर बोंब मारण्याची प्रथा सर्वत्र पहायला मिळतेही विकृती नसून त्यामागेही शास्त्र दडलेले आहे; मात्र काही ठिकाणी याचा अतिरेक केला जाऊन परस्परांतील वैर चव्हाट्यावर आणण्यासाठीही बोंब मारली जातेहोळीच्या दिवशी अश्‍लील शब्द उच्चारणेशिवीगाळ करणे आदी कृती परंपरा म्हणून केल्या जातातयाला धर्मशास्त्रात आधार नाहीमुळात संस्कृत भाषेत एकही शिवी नाहीअसे असतांना ‘शिवीगाळ करणे’ हा हिंदूंच्या सणाचा भाग कसा होऊ शकेल ? होळीच्या दिवशी बोंब मारतांना शिवीगाळ करणे धर्मशास्त्राच्या दृष्टीने चुकीचे आहेदुष्ट प्रवृत्ती शांत होण्याकरिता हा विधी आहेफाल्गुन शुद्ध पौर्णिमेला पूर्वा फाल्गुनी नक्षत्र येतेत्या नक्षत्राची देवता ‘भग’ ही आहेतेव्हा भगाच्या नावाने बोंब ठोकायचीही एकप्रकारची पूजाच होयतो त्या देवतेचा सन्मानच समजावा

होलिकोत्सवातील गैरप्रकार रोखणेहे आपले धर्मकर्तव्य आहे ! –  सांप्रत होळीच्या निमित्ताने गैरप्रकार होतातउदावाटमारी होतेदुसर्‍यांची झाडे तोडली जातातमालमत्तेची चोरी होतेदारू पिऊन धिंगाणा घातला जातोतसेच रंगपंचमीच्या निमित्ताने एकमेकांना घाणेरड्या पाण्याचे फुगे फेकून मारणेघातक रंग अंगाला फासणे आदी गैरप्रकार होतातया गैरप्रकारांमुळे धर्महानी होतेही धर्महानी रोखणे हे आपले धर्मकर्तव्यच आहेयासाठी समाजाचेही प्रबोधन कराप्रबोधन करूनही गैरप्रकार घडतांना आढळल्यास पोलिसांत गार्‍हाणे करासनातन संस्था समविचारी संघटना आणि धर्मप्रेमी यांच्यासह यासंदर्भात अनेक वर्षांपासून जनजागृती चळवळ राबवत आहेआपणही यात सहभागी होऊ शकतावर्षभर होणार्‍या वृक्षतोडीने जंगले उजाड होत असतांनात्याकडे काणाडोळा करणारे तथाकथित पर्यावरणवादी आणि धर्मविरोधी संघटना वर्षातून एकदा येणार्‍या होळीला कचर्‍याची होळी करा‘, अशा स्वरूपाच्या चळवळी राबवतातही धर्मविरोधी मंडळी परंपरा नष्ट करण्यासाठीच प्रयत्न करतातहेच यातून दिसतेत्यामुळे हिंदूंच्या धार्मिक परंपरांत कोणी लुडबुड करू नयेहिंदूंनोधर्मविरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता पर्यावरणपूरकअपप्रकार विरहितमात्र धर्मशास्त्र सुसंगत अशी होळी साजरी करा  

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

संकलक : श्री विठ्ठल जाधव  संपर्क क्र. : 7038713883

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 20, 2026

March 20, 2026

March 20, 2026

March 20, 2026

March 20, 2026

March 20, 2026