पुणे : पुणे महानगरपालिका च्या प्राथमिक शिक्षण विभागाने शहरातील काही शाळांबाबत महत्त्वाचे आवाहन केले आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात तपासणीदरम्यान १३ शाळा अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले असून, येत्या २०२६-२७ शैक्षणिक वर्षात पालकांनी या शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश देऊ नये, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे पालकांनी प्रवेश घेताना शाळेची मान्यता तपासणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
अनधिकृत शाळांची यादी
प्राथमिक शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या अनधिकृत शाळांची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
-
न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल, बिबवेवाडी
-
महात्मा गांधी प्रशाला, येरवडा
-
टीम्स तकवा इस्लामिक स्कूल ॲण्ड मक्तब, कोंढवा खुर्द
-
सेंट व्ह्यू इंटरनॅशनल स्कूल, कोंढवा बुद्रुक
-
इमॅन्युअल पब्लिक स्कूल, महमंदवाडी रोड, हडपसर
-
आकांक्षा ॲकॅडमी स्कूल, लोहगाव
-
एलोरा मेडिकल ॲण्ड एज्युकेशन फाउंडेशन आर्यन पब्लिक स्कूल, मानाजी नगर
-
लेगसी हाय स्कूल, कोंढवा बुद्रुक
-
शिबली नोमानी इंग्लिश मिडीयम स्कूल, कोंढवा बुद्रुक
-
ऑर्चिड द इंटरनॅशनल स्कूल, उंड्री
-
ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट – इकरा इस्लामिक स्कूल, कोंढवा
-
ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कूल, आंबेगाव बुद्रुक
-
आर्यन वर्ल्ड स्कूल, उंड्री
पालकांना आवाहन
महापालिकेने पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत, शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळेची शासनमान्यता तपासावी, असे सांगितले आहे. तसेच, अधिकृत शाळांची यादी व माहिती प्राथमिक शिक्षण विभागाकडून मिळू शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
शहरात शिक्षणाच्या नावाखाली अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळांवर कारवाई सुरू असून, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.





