प्रतिक गंगणे । नसरापूर घटना ताजी असतानाच पर्वतीच्या पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर पर्वती पायथ्याच्या परिसरात नागरिक संतप्त झाले आहेत. या घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केलीय. संतप्त नागरिकांनी आरोपींना ताब्यात द्या अशी मागणी केलीय. पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पुण्यात ५० वर्षीय व्यक्तीकडून ९ वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला. सुदैवाने परिसरातील नागरिकांना हे लक्षात येताच मुलीची सुखरुप सुटका केली गेली आणि पुढील अनर्थ टळला. मात्र या घटनेनंतर नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला आहे. काही नागरिकांनी हे सामूहिक अत्याचाराचं प्रकरण असल्याचा आरोप केला आहे.
नागरिक मोठ्या संख्येनं परिसरात जमा झाले आहेत. एका ९ वर्षांच्या मुलीवर पर्वती पायथ्याच्या परिसरात सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न झाला. पोलिसांनी संशयितांना त्यांच्या ताब्यात घेत पुढील कारवाई केली जात आहे. यावेळी नागरिकांनी आरोपींना आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली आहे.
मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्याचा प्रकार समोर येताच संतप्त नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. पर्वती पायथ्यापासून नवी पेठेपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर नागरिक उतरले आहेत. आरोपींना आमच्या ताब्यात द्यावं असं म्हणत नागरिक आक्रमक झाले आहेत.
वरिष्ठ पोलीस घटनेची माहिती घेत आहेत. घटनास्थळी पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा हे दाखल झाले आहेत. जमाव संतप्त झाला असून त्यांना शांतता राखण्याचं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात झाला आहे. संशयित आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येतेय.





