सोनालिकाची आर्थिक वर्ष २०२७ ला दमदार सुरुवात १६,२२३ ट्रॅक्टर विक्रीसह ३५.६% वाढ

By: Editor_Pratik

On: Tuesday, May 5, 2026 11:13 AM

Google News
Follow Us

पुणे , ४ मे २०२६: भारतातील नंबर १ ट्रॅक्टर निर्यात ब्रँड असलेल्या सोनालिका ट्रॅक्टर्सने एप्रिल महिन्यात आजपर्यंतची सर्वाधिक एकूण १६,२२३ ट्रॅक्टरची विक्री करून आर्थिक वर्ष २०२७ च्या प्रवासाची जोरदार आणि धोरणात्मक सुरुवात केली आहे. या उद्योगातील बाजारपेठेचा सर्वाधिक वाटा मिळविणाऱ्यांमध्ये तिने प्रमुख स्थान मिळवले आहे. यासाठी तिच्या स्तंभित करेल अशा ३५.६ % एकंदर वाढीची चालना मिळाली असून तिने उद्योगाच्या २७% (अंदाजे) वाढीच्या कामगिरीलाही मागे टाकले आहे.

कंपनीची आपल्या ३० व्या वर्षात ‘जीतने का दम’ मिळवून देण्याच्या शेतकरी-प्रथम तत्त्वज्ञानावर निर्भरता कायम असून अधिक शेतकरी कार्यक्षमता आणि उत्पन्न क्षमतेसाठी प्रगत कृषी-नवकल्पनांचा तिला आधार मिळाला आहे.

अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन आणि जीएसटीच्या दरात कपात झाल्यानंतर वाढत्या यांत्रिकीकरणामुळे, भारताच्या शेती क्षेत्राच्या वाढीच्या गाथेचा पुढील टप्पा तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन पोर्टफोलिओ आणि अंमलबजावणीचा अथक वेग यांवर अवलंबून असेल. हवामानातील अस्थिरता आणि वाढत्या कामगिरीच्या अपेक्षांमुळे ग्रामीण भागातील आकांक्षा आकाराला येत आहेत. अशा वेळेस सोनालिका १९ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांसाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उभी आहे. आपले उच्च गुणवत्तेचे ट्रॅक्टर सर्व प्रकारच्या वापरांमध्ये अखंडपणे कामगिरी करतील याची हमी ती देते. जगातील सर्वात मोठा इंटिग्रेटेड ट्रॅक्टर उत्पादक कारखाना आणि प्रगत संशोधन आणि विकास क्षमतांचे पाठबळ लाभलेला हा ब्रँड शक्तिशाली आणि भविष्यवेधी उत्पादनांसह भारतीय शेतीच्या परिवर्तनाचे नेतृत्व करत आहे.

या प्रसंगी बोलताना इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक रमण मित्तल म्हणाले, “’आमच्या ऐतिहासिक ३० व्या वर्षात, एप्रिल महिन्यातील १६,२२३ ट्रॅक्टर विक्रीची आमची सर्वोच्च कामगिरी ही तंत्रज्ञानावर आधारित शेतीकडे वळण्याचे संकेत देत आहे. शेतकऱ्यांना जीतने का दम मिळवून देण्याच्या आणखी अधिकच कटिबद्धतेसह आम्ही आर्थिक वर्ष २०२७ च्या प्रवासाला सुरूवात करत आहोत. आम्ही ३५.६% ची दमदार वाढ नोंदवून उद्योगाच्या कामगिरीवरही मात केली आहे आणि उद्योगातील बाजारपेठेचा सर्वाधिक वाटा मिळविणाऱ्यांमध्ये आम्ही प्रमुख स्थानी उभे आहोत.

आर्थिक वर्ष २०२७ साठी आम्ही जी गती मिळवत आहोत ती भारताच्या कृषी परिवर्तनामध्ये तीव्र नवकल्पना निर्माण करण्यावर आणि शेतकऱ्यांशी अधिक सखोल संपर्क साधण्यावर केंद्रित आहे. शेतीचे भवितव्य हे पूर्वीपेक्षा अधिक ठळक असणार असून आम्ही अधिक तीव्रपणे लक्ष केंद्रित करून, गोल्ड सिरीजसारख्या भविष्यवेधी उत्पादनांसह आणि भारतीय शेतकऱ्यांच्या आकांक्षांना बळ देण्यासाठी अढळ कटिबद्धतेसह तयार आहोत.”

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now