ब्लॅक डॉग स्कॉच व्हिस्कीकडून नवीन आकर्षक पॅकेजिंग केले सादर

By: Editor_Pratik

On: Tuesday, May 5, 2026 11:06 AM

Google News
Follow Us

पुणे : ब्लॅक डॉग व्हिस्की या भारतातील अत्यंत प्रतिष्ठित ब्लेंडेड स्कॉच व्हिस्की ब्रँडने आपले नवीन आणि प्रगत पॅकेजिंग सादर केले आहे. हे नवीन डिझाइन गेल्या १४० वर्षांहून अधिक काळ चालत आलेल्या समृद्ध वारशाचा आत्मविश्वासपूर्ण टप्पा आहे. यामध्‍ये बाह्य रूपामध्‍ये बदल करण्‍यात आला असून त्‍यामधून ब्रँडचे मूळ वैशिष्‍ट्य दिसून येते, जे ग्राहकांना क्षणभर थांबून प्रत्येक सिपचा मनसोक्त आस्वाद घेण्याचे आवाहन करते.

हे नवीन डिझाइन अतिशय सूक्ष्म आणि प्रगत अशा ‘सेव्हर कोड्स’सह सादर करण्यात आले आहे. यामध्ये अत्यंत बारकाईने केलेले काम, प्रीमियम दर्जाचे संकेत आणि सुस्पष्ट मांडणी यांचा समावेश आहे. हे डिझाइन आजच्या तरुण आणि बदलत्या पिढीच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन तयार केले आहे, तरीही यात ब्लॅक डॉगची मूळ ओळख कायम राखण्यात आली आहे.

या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी ब्रँडची ‘सेव्हर द सिप’ संकल्पना आहे – स्कॉच पिणे ही एक घाईघाईची कृती नसून सजग आणि तल्लीन करणारा अनुभव असावा, असे हे आमंत्रण आहे. स्कॉटलंडमधील निवडक डिस्टिलरीजमधून, विशेषतः प्रसिद्ध लिंकवूड डिस्टिलरीमधून, जिथे निष्णात कारागीर प्रत्येक थेंबाला परिपूर्ण बनवतात, हा ब्लेंड तयार केला जातो. ही व्हिस्की थ्री-कास्क मॅच्युरेशन प्रक्रियेतून जाते, ज्‍यामधून कारागिरी आणि फ्लेवरमधील सूक्ष्म बारकावे दिसून येतात.

अधिक सुस्पष्ट आणि प्रीमियम संरचना दृढ करत ब्लॅक डॉग व्हिस्कीच्या नूतनीकरण केलेल्या पोर्टफोलिओमध्ये दोन वैशिष्ट्यपूर्ण प्रकारांचा समावेश आहे, जे प्रत्येक ग्राहकाला अनोखा चवीचा अनुभव देतात:

ब्लॅक डॉग ब्लॅक रिझर्व्ह – निवडक स्कॉटिश माल्ट्सपासून तयार केलेली ही समृद्ध आणि परिपूर्ण स्कॉच व्हिस्की आहे. यामध्ये माल्टचा गडदपणा असून ओक आणि शेरीचा सूक्ष्म गोडवा लाभलेला संतुलित फिनिश अनुभवायला मिळतो.

ब्लॅक डॉग ट्रिपल गोल्ड रिझर्व्ह – स्कॉटलंडमध्ये ट्रिपल कास्क प्रक्रियेद्वारे परिपक्व झालेली ही लक्झरी स्कॉच व्हिस्की आहे. यामध्ये ओक, टॉफी व व्हॅनिलाचे अतिशय मऊ आणि स्‍तरीय फ्लेवर्स आहेत, ज्‍यामधून उत्‍साहवर्धक स्वाद मिळतो.

या उत्क्रांतीबाबत मत व्‍यक्त करत डिआजियो इंडियाचे मार्केटिंग व पोर्टफोलिओ हेड आणि व्हाईस प्रेसिडेंट वरुण कुरीच म्हणाले, आजचे ग्राहक अधिक अर्थपूर्णता, कारागिरी आणि सजग क्षणांच्या शोधात आहेत, त्यामुळे ब्लॅक डॉग नेहमीप्रमाणे आजही त्यांच्यासाठी तितकाच सुसंगत असावा, अशी आमची इच्छा होती. हे नवीन पॅकेजिंग म्हणजे आमच्या वारशाचा सन्मान करण्याचे आणि नवीन पिढीला हा ब्रँड आपलासा करण्यासाठी दिलेले एक आमंत्रण आहे, जेणेकरून प्रत्येक सिप मनापासून आस्वाद घेण्याजोगा क्षण बनेल.”

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now