पुणे : ‘आपण शेतीवर ,जंगलावर , पाण्यावर आणि स्वच्छ हवेवर अवलंबून आहोत. भविष्यात ते आपलयाला मिळणार नाही,असे संशोधन आहे.याची काळजी वाटते .पृथ्वीचे भवितव्य आपल्या हाती सुरक्षित असेल हे पाहणे आपली जबाबदारी आहे.ती प्रदूषित होणार नाही,हे पाहणे प्रत्येकाची जबाबदारी आहे.पर्यावरण विषयक आस्थेला कृतीची जोड मिळणे आवश्यक आहे’, असा संदेश तेर पॉलिसी सेंटर या पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक डॉ.विनिता आपटे यांनी दिला आहे.
जागतिक पर्यावरण दिन (५ जून) च्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे मनोगत व्यक्त केले आहे.
शहरी भागातील झाडे प्रदूषित हवा स्वच्छ करून त्या भागात राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत करतात. धुरापासून तयार होणारे धुके कमी करण्यासाठी साहाय्य करतात. जमिनीची धूप रोखतात आणि जमिनीचा कसा वाढवतात. स्थानिक जैवविविधता वाढीसाठी मदत करतात. उष्णता व थंडी यांपासून इमारतींचे रक्षण करतात. या सर्वांचा अभ्यास करूनच ‘नागरी वनीकरणा’ची कल्पना राबवली गेली. आज जगभरात अशा जंगल निर्मितीला प्रोत्साहन दिले जात आहे.शहरातील वाढत्या प्रदूषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी शहरातील टेकड्यांवर ,मोकळ्या जागांवर नागरी वने निर्माण करणे हा उपाय असून ‘अर्बन फॉरेस्ट ‘ चळवळीत लोक सहभाग वाढविण्यासाठी तेर पॉलिसी सेंटरने आवाहन केले आहे
निसर्गाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी केवळ झाडे लावणे पुरेसे नाही तर त्यांचे जतन तेवढेच आवश्यक आहे,पर्यावरणाबाबत आस्था असलेल्यांची संख्या लक्षणीय आहे, मात्र त्याला प्रत्यक्ष कृतीची जोड देणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी मध्ये जागतिक स्तरावरील पर्यावरण विषयक लेखन झाडे, त्यांचे अधिवास यांबाबत भरपूर माहिती मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे,असेही त्यांनी म्हटले आहे.
मी पर्यावरण क्षेत्रात काम करणा-या अनेक महिला बघत असते . आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असणा-या महिला खुप जास्त आहेत. जंगल खात्यासारख्या पुरुषप्रधान क्षेत्रात महिला आपला वेगळा ठसा उमटवत आहेत याचा विशेष अभिमान वाटतो. पृथ्वी वरचं पर्यावरण वाचवायचं असेल तर महिलांचे योगदान मह्त्वाचे आहे. पाण्याची बचत, विजेची बचत व स्वच्छता यासारख्या गोष्टी महिलाच प्रभावी पद्धतीने करु शकतात,असेही डॉ.आपटे यांनी म्हटले आहे.