USsquare Media & Publicity : युएसस्क्वेअर मिडीया ॲण्ड पब्लिसिटी आयोजित ‘इंडिया अर्थ २०२४’ स्पर्धेचा समारोप

पुणे (प्रतिनिधी) : युएस स्क्वेअर मिडीया ॲण्ड पब्लिसिटी (USsquare Media & Publicity) मार्फत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इंडिया अर्थ या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षीचे इंडिया अर्थ २०२४चे आयोजन रिलायन्स मॉल, एल्प्रो सिटी स्क्वेअर पिंपरी चिंचवड येथे २६ मे २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले होते. प्रत्येकवर्षी प्रमाणे या शोचे फॅशन शो डायरेक्टर उद्धव खरड होते.

वेगवेगळया शहरातून व राज्यातून स्पर्धकांनी या शो मध्ये भाग घेतला होता. या शो चे मिस्टर इंडिया अर्थचे विजेते कृष्णा मुरारी, मिस इंडिया अर्थचे विजेत्या दीपाश्री शिंदे, मिसेस इंडिया अर्थचे विजेते प्रिती रस्तोगी, कीड्स इंडिया अर्थची विजेती त्रिशा जाधव झाली असून सर्व स्पर्धकांनी चांगली कामगिरी केली.

इंडिया अर्थ २०२४ या शोचे जूरी म्हणून वृशाली साळी, स्नेहल पाठक व निलेश सिंह यांनी जबाबदारी पार पाडली.

प्रमुख पाहुण्यांमध्ये दीपाली मुंढारे, हृषीकेश वाडेकर, अमित कुमार, विघ्नेशा, दीप बिस्ट आणि बरेच मॉडेल्स यांनी आपली हजेरी लावली होती. फॅशन फोटोग्राफर मॅक्स चोपडे आणि व्हिडिओग्राफर ऋषीकेश गायकवाड यांनी शो मध्ये चांगली कामगिरी केली.

आयेशा शेख व त्यांच्या टीमने शो मधील सर्व मॉडेल्सचा मेकअप आणि हेयरस्टाइलचे काम केले.

मिस श्रुती घरबिडी, मिसेस दीपा पुण्यर्थी, कीड्स अर्नवी वासकर या मॉडेल्सने शोमध्ये शो स्टॉपर म्हणून रॅम्प वॉक करत सर्व प्रेक्षकांना आकर्षित केले. मिसेस ज्योती ठाकूर यांनी मिसेस कॅटेगरीमध्ये शो ओपनर म्हणून रॅम्प वॉक केला.

सर्व स्पर्धकांना ट्रॉफी, सैश, सर्टिफिकेट, क्राउनिंग करुन सन्मानित केले. इंडिया अर्थ २०२४ या शोचे आयोजन मोठ्या दिमाखात पार पडला व आलेले सर्व पाहुणे व प्रेक्षक यांनी कौतुक ही केले.