वंदे मातरम् संघटना व संयुक्त युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्टचा मराठवाडा दौरा

By: Editor_Manas

On: Wednesday, November 4, 2026 5:18 AM

Google News
Follow Us

पुणे -मराठवाड्यातील कोरड्या दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी वंदे मातरम् संघटना आणि संयुक्त युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्ट यांच्या वतीने विशेष मदत अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत पुण्यातून १,१५० फराळ किट, २५० अन्नधान्य व किराणा किट, ४० विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणि ४०० आकाशकंदील घेऊन मराठवाड्याकडे रवाना होणार आहोत.

या दौऱ्याचा शुभारंभ बुधवार दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता कल्पना हॉटेल, सारसबाग, पुणे येथून सर्वसामान्य पुणेकरांच्या हस्ते वाहनपूजन करून करण्यात येणार आहे.

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविण्याच्या या सामाजिक उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी पुणेकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फ करण्यात आले आहे.

या अभियानाच्या पूर्वसंध्येला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठीच्या किटचे पॅकिंग सुरू होते. यावेळी वंदे मातरम संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सचिन जामगे, आयटी सेल आणि माहिती अधिकार अध्यक्ष विशाल शिंदे , शहराध्यक्ष अमोल जगताप , कार्याध्यक्ष मोहित काकडे , जिल्हाध्यक्ष जहिर मुलानी , विद्यार्थी अध्यक्ष आकाश जामगे राज घाटे उपस्थित होते.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

November 1, 2026

Pratik Gangane

October 31, 2026

October 30, 2026

October 30, 2026

October 28, 2026

October 27, 2026