ऑनलाइन औषध विक्रीवर नियंत्रणासाठी आमदार शेखर निकम यांची अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांशी चर्चा

By: Editor_Manas

On: Tuesday, May 19, 2026 4:05 PM

Google News
Follow Us

मुंबई : राज्यात वाढत्या ऑनलाइन औषध विक्रीमुळे सार्वजनिक आरोग्य, रुग्ण सुरक्षा तसेच अधिकृत औषध विक्रेत्यांसमोर निर्माण झालेल्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची मंत्रालयात भेट घेत संबंधित विषयाकडे गांभीर्याने लक्ष वेधले.

यापूर्वी चिपळूण तालुका औषध विक्रेते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार शेखर निकम यांची भेट घेऊन ऑनलाइन औषध विक्रीमुळे उद्भवत असलेल्या विविध अडचणींबाबत सविस्तर निवेदन दिले होते. या निवेदनाची गंभीर दखल घेत आमदार निकम यांनी हा विषय शासन दरबारी प्रभावीपणे मांडत मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

यावेळी ऑनलाइन माध्यमातून वैद्यकीय चिठ्ठीची योग्य पडताळणी न करता होणारे औषध वितरण, काही कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अवाजवी सवलती तसेच त्यामुळे पारंपरिक आणि अधिकृत औषध विक्रेत्यांवर होत असलेला आर्थिक परिणाम या विषयांकडे आमदार निकम यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले.

औषध विक्री हा अत्यंत संवेदनशील विषय असून तो थेट जनतेच्या आरोग्याशी संबंधित असल्याने यासंदर्भात कठोर नियमावली आणि प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच अवैध ऑनलाइन औषध विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने तातडीने प्रभावी पावले उचलावीत, रुग्ण सुरक्षा सुनिश्चित करावी तसेच अधिकृत औषध विक्रेत्यांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणीही आमदार शेखर निकम यांनी यावेळी केली.

यावर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी जनतेचे आरोग्य, रुग्णांची सुरक्षितता तसेच अधिकृत औषध विक्रेत्यांचे हित जपण्यासाठी शासन स्तरावर सकारात्मक पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

May 19, 2026

May 19, 2026

May 19, 2026

May 19, 2026

May 19, 2026

May 19, 2026