देशात वाढत्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट)च्या मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. सरकार गॅस सिलिंडरचे साठे पुरेसे असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात गॅस एजन्सीबाहेर लागलेल्या रांगा आणि बंद पडणाऱ्या खाणावळी यामुळे तुटवड्याचे वास्तव स्पष्ट दिसत असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. “सरकारच्या दाव्यांपेक्षा प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे. मग सरकार नेमके कुणाला फसवत आहे?” असा सवालही करण्यात आला आहे.
अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे की, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर लादलेल्या युद्धामुळे जागतिक इंधनपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. अनेक देशांना पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरवठा आखाती देशांतून होत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध आणल्यामुळे इंधनपुरवठा विस्कळीत झाला असून अनेक देशांमध्ये इंधन टंचाईची भीती निर्माण झाली आहे. भारतातही स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा वाढत चालल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.
मुंबईत 30 टक्क्यांहून अधिक रेस्टॉरंट्स बंद असल्याचा दावा
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्याचा मोठा परिणाम हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायावर झाला आहे. गॅस उपलब्ध नसल्याने अनेक छोटी उपाहारगृहे आणि खाणावळी बंद पडत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षण आणि कामानिमित्त शहरात राहणाऱ्या विद्यार्थी व कामगार वर्गाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उद्योग क्षेत्रालाही गॅसपुरवठा बंद करण्यात आल्याने अनेक कंपन्यांवर परिणाम झाला आहे. मुंबईतच 30 टक्क्यांहून अधिक हॉटेल्स-रेस्टॉरंट्स बंद पडल्याचा दावा अग्रलेखात करण्यात आला आहे.
केटरिंग व्यवसायावरही संकट
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असताना गॅस टंचाईमुळे केटरिंग व्यवसायालाही मोठा फटका बसत असल्याचे म्हटले आहे. गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी जास्त खर्च करावा लागत असल्याने अनेक केटरर्सनी लग्न समारंभांच्या ऑर्डर घेणे कमी केले आहे. मार्च-एप्रिल हा पर्यटनाचा हंगाम असतानाही गॅस टंचाईमुळे पर्यटनस्थळांवरही परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. कोकणातील गणपतीपुळे मंदिरात गॅस अभावी लाडू आणि खिचडीचा प्रसादही काही काळ बंद ठेवावा लागल्याचे अग्रलेखात नमूद आहे.
नाथषष्ठी यात्रेलाही फटका
पैठण येथे होणाऱ्या नाथषष्ठी यात्रेलाही गॅस टंचाईचा परिणाम झाल्याचे सांगण्यात आले आहे. सिलिंडर उपलब्ध नसल्याने अनेक दिंड्यांना अर्ध्या रस्त्यातूनच परत जावे लागल्याचा दावा करण्यात आला आहे. पुण्यातील काही वसतिगृहांमध्येही गॅसअभावी पोळी-भाजीऐवजी वरण-भात दिला जात असल्याचे उदाहरण देण्यात आले आहे.
गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या रांगा
मुंबई-पुण्यासह देशातील अनेक शहरांमध्ये गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत असल्याचा उल्लेख अग्रलेखात आहे. मात्र केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी देशात एलपीजीचे साठे पुरेसे असून उत्पादनात 28 टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा केला आहे.
अग्रलेखात पुढे प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे की, जर गॅसचे साठे पुरेसे असतील तर सिलिंडर बुकिंगचा कालावधी का वाढवण्यात आला? शहरांमध्ये 21 दिवसांऐवजी 25 दिवसांनी, तर ग्रामीण भागात 45 दिवसांनीच बुकिंग करण्याचा नियम का लागू करण्यात आला? सरकारचे दावे आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये विरोधाभास असल्याचा आरोप करत “सरकार नेमके कुणाला फसवत आहे?” असा सवाल अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.