हिंदु राष्ट्र जागृती सभेच्या प्रसारासाठी हडपसर (पुणे) येथे भव्य वाहनफेरी !

By: Editor_Manas

On: Friday, April 3, 2026 3:12 PM

Google News
Follow Us

हडपसर (पुणे), प्रतिनिधी : हडपसर येथे आयोजित हिंदू राष्ट्रजागृती सभेच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या भव्य वाहनफेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दुचाकींवर फडकणारे भगवे ध्वज, पारंपारिक वेशभूषेतील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

फेरीच्या प्रारंभी जय शंकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विप्र शिरोमणी सु. द. (पप्पाजी) पुराणिक यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, पू. (सौ.) मनीषा पाठक तसेच हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र-छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

मार्गावर स्वागत व उत्साहपूर्ण वातावरण

फेरीदरम्यान मार्गावरील अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी फटाके वाजवूनही स्वागत करण्यात आले. हिंदुत्वनिष्ठ हनुमंत गावडे, नगरसेवक नितीन गावडे तसेच नगरसेविका मोनिका पवार यांनी धर्मध्वजाचे स्वागत केले.

फेरीत ‘हिंदू ऐक्य’ आणि ‘हिंदुत्वाचा गौरव’ यांसारख्या घोषणा देण्यात आल्या. तसेच ‘मनामनात श्रीराम’, ‘धर्मशिक्षण हाच धर्मरक्षणाचा मार्ग’ अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. फेरीमध्ये धर्मसभेची माहिती देणारी चलचित्रफीत दाखवणारा टेम्पोही सहभागी होता.

१०० हून अधिक वाहनांचा सहभाग

भेकराईनगर पीएमटी बस डेपो येथून दुपारी ५ वाजता सुरू झालेली ही फेरी पापडेवस्ती, काळेपडळ, ससाणेनगर, पुरोहित स्वीट चौक या मार्गाने फिरून कै. मारुतराव काळे विद्यालयाच्या मैदानात समाप्त झाली. या फेरीत १०० हून अधिक वाहने आणि सुमारे २०० हून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. महिलांची उपस्थिती विशेष लक्षणीय होती.

समारोप सभेत मार्गदर्शन

समारोपप्रसंगी वाहनफेरीचे सभेत रूपांतर झाले. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे पराग गोखले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत हिंदू राष्ट्र स्थापनेच्या संकल्पनेबाबत विचार मांडले.

५ एप्रिलला धर्मसभा

५ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता कै. मारुतराव काळे प्राथमिक विद्यालयाच्या मैदानावर हिंदू राष्ट्रजागृती सभा होणार आहे. या सभेला सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, ‘श्रीराम युवा सेने’चे संस्थापक-अध्यक्ष आमदार टी. राजासिंह तसेच सुनील घनवट मार्गदर्शन करणार आहेत.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

Trupti Desai

July 15, 2026

July 14, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026