भारत, हैदराबाद, मार्च 2026: जीपीयू आर्किटेक्चर आणि राजा कोडुरी यांनी स्थापना केलेली एआय तंत्रज्ञान कंपनी ओएक्सएमआयक्यू लॅब्ज (“ओएक्सएमआयक्यू”) ने आज एएम ग्रुपचा व्यवसाय विभाग असलेल्या एएम इंटेलिजन्स लॅब्ज (“एएमआय लॅब्ज”) सोबत एक धोरणात्मक तंत्रज्ञान भागीदारी जाहीर केली आहे. या भागीदारी अंतर्गत एएमआय लॅब्जच्या 2030 पर्यंतच्या 2 GW एआय कॉम्प्युट क्षमतेसाठी डेटा सेंटर आणि प्रणाली पायाभूत सुविधांबाबत सल्लागार सेवा पुरवण्यात येणार आहेत. यामध्ये भारतातील उत्तर प्रदेशमध्ये 1 GW क्षमतेचा प्रारंभिक एआय कॉम्प्युट हब उभारला जाणार आहे.
एएमआय लॅब्ज हा एएम ग्रुपचा धोरणात्मक व्यवसाय विभाग आहे. एएम ग्रुप ही ग्रीनकोची मूळ कंपनी आहे. ग्रीनको ही भारतातील सर्वात मोठी हरित ऊर्जा उत्पादक कंपनी असून त्यांच्याकडे सौर, पवन आणि जलऊर्जा क्षेत्रात 50 GW अक्षय ऊर्जा क्षमतेचा पोर्टफोलिओ आहे. त्याला 100 GWh इंटेलीजंट ऊर्जा साठवणुकीचे पाठबळ असून कंपनी भारताच्या एकूण वीजपुरवठ्यापैकी सुमारे 2% वीज पुरवते. पारंपरिक डेटा सेंटर वीजखर्चापेक्षा 50–70% कमी किमतीत उपलब्ध अशी कंपनीच्या मालकीची ऊर्जा असून ती कार्यान्वित केली जाते आणि कार्बनमुक्त आहे.
भारत वेगाने एआय वापर आणि टोकन वापराच्या दृष्टीने जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. त्यायोगे जागतिक एआय अर्थव्यवस्थेत देश एक महत्त्वाचे मागणी केंद्र बनत आहे. मोठ्या विकसक परिसंस्थेमुळे, डिजिटल अर्थव्यवस्थेमुळे आणि उद्योग क्षेत्रात एआयचा जलद वाढणारा स्वीकार यामुळे ही वाढ होत आहे.
एएम ग्रुपने त्यांच्या प्रमुख एआय पायाभूत सुविधा उपक्रमाचा विकास सुरू केला असून त्यामध्ये नॉयडा कॉम्प्युट हबची फेज 1 सध्या सक्रिय अंमलबजावणी टप्प्यात आहे. 2027 च्या अखेरीस प्रारंभिक कॉम्प्युट क्षमता ऑनलाइन आणणे हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल कारण ग्रुप जगातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जेवर चालणाऱ्या एआय कॉम्प्युट प्लॅटफॉर्मपैकी एक उभारत आहे. प्रणाली आर्किटेक्चर, पायाभूत सुविधा डिझाइन आणि मॉड्युलर अंमलबजावणी वितरण यांचे ऑप्टिमायझेशन करण्यासाठी ओएक्सएमआयक्यू एएम ग्रुपसोबत जवळून काम करत आहे. त्यायोगे हा प्लॅटफॉर्म जलद गतीने कार्यरत होईल आणि उत्कृष्ट कार्यक्षमता व मोठ्या प्रमाणावर विस्तार साध्य करता येईल.
या भागीदारी अंतर्गत ओएक्सएमआयक्यू कॉम्प्युट प्लॅटफॉर्मसाठी आर्किटेक्चर आणि अभियांत्रिकी भागीदार म्हणून काम करेल. ते एएमआय लॅब्जसोबत मिळून प्रणाली आर्किटेक्चर, हार्डवेअर रोडमॅप आणि पुरवठा साखळी धोरण डिझाइन करतील. ते या सुविधेचा पाया असतील. ओएक्सएमआयक्यूकडे संपूर्ण कॉम्प्युट स्टॅकमध्ये सखोल कौशल्य आहे. त्यामध्ये ट्रान्झिस्टर-स्तर जीपीयू आर्किटेक्चर, प्रगत पॅकेजिंग, रॅक-स्तर प्रणाली, उच्च-कार्यक्षमता इंटरकनेक्ट्स आणि मोठ्या प्रमाणावर एआय वर्कलोड चालवण्यासाठी आवश्यक असलेले ऑर्केस्ट्रेशन सॉफ्टवेअर यांचा समावेश आहे. एकत्रितपणे ही भागीदारी फोटॉन्सपासून परिणामांपर्यंत एंड-टू-एंड ऑप्टिमायझेशन पुरविते. त्यामुळे शेवटी झेट्टास्केल (सर्वांसाठी सुलभ आणि किफायतशीर बनेल इतक्या मोठ्या प्रमाणावर एआय कॉम्प्युट तयार करणे) अर्थव्यवस्था सर्वांसाठी सुलभ होते.
एएम ग्रुप नॉयडामध्ये पूर्णपणे व्हर्टिकल पद्धतीचा समग्र प्लॅटफॉर्म 1 GW एआय हाय परफॉर्मन्स कॉम्प्युट हब विकसित करत आहे. यामध्ये कंपनीच्या मालकीची कार्बनमुक्त वीज निर्मिती, प्रगत डेटा सेंटर पायाभूत सुविधा, उच्च-कार्यक्षमता अॅक्सेलरेटर्स, संपूर्ण सॉफ्टवेअर स्टॅक, अॅप्लिकेशन्स आणि एआय पॉड्स-अॅज-अ-सर्व्हिसपासून टोकन्स-अॅज-अ-सर्व्हिसपर्यंत विविध लवचिक उपयोजन मॉडेल्सचा समावेश असेल.
कॉम्प्युट स्टॅकमधील ओएक्सएमआयक्यूचे सखोल कौशल्य या प्लॅटफॉर्मला फोटॉन्सपासून टोकन्सपर्यंत एंड-टू-एंड ऑप्टिमायझेशनसाठी आर्किटेक्ट करण्यास सक्षम करते. अक्षय ऊर्जा निर्मितीपासून डेटा सेंटर आर्किटेक्चर, लिक्विड कूलिंग, इंटरकनेक्ट टोपोलॉजी, अॅक्सेलरेटर निवड आणि वर्कलोड ऑर्केस्ट्रेशनपर्यंत प्रत्येक स्तर एकसंध प्रणाली म्हणून अभियांत्रिकी पद्धतीने विकसित केला जाईल. हा एकात्मिक दृष्टिकोन उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य इलेक्ट्रॉन्स-टू-टोकन्स अर्थव्यवस्था खुली करतो आणि गिगावॅट स्तरावर अत्यंत कमी खर्चातील एआय कॉम्प्युट उपलब्ध करून देतो.
“ओएक्सएमआयक्यूमुळे एएमआय लॅब्जला उद्योगातील सर्वात सखोल हार्डवेअर आणि व्यवस्थाप्रणाली कौशल्याचा फायदा होत आहे. सिलिकॉन व्हॅलीतील अग्रगण्य कंपन्यांमधील त्यांच्या टीमचा अनुभव हा जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकणारी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आम्हाला आवश्यक असलेला अगदी अचूक लाभ आहे. एकत्रितपणे आम्ही एएमआय लॅब्जकरता पूर्ण-स्टॅक एआय कॉम्प्युट प्लॅटफॉर्म बनण्यासाठीचा पाया रचत आहोत,” असे एएम ग्रुपचे ग्रुप चेअरमन अनिल चालमलसेट्टी म्हणाले.
“एएमआय लॅब्ज हे ओएक्सएमआयक्यूसाठी आदर्श भागीदार आहेत. मोठ्या प्रमाणातील एआय पायाभूत सुविधांमधील सर्वात कठीण अडथळा त्यांनी सोडवला आहे. तो म्हणजे जागतिक स्तरावर विश्वासार्ह, कार्बनमुक्त सुलभ ऊर्जा. आमच्या टीमने जगातील सर्वात प्रगत संगणकीय प्लॅटफॉर्मना शक्ती देणारे सिलिकॉन, प्रणाली आणि सॉफ्टवेअर तयार करण्यात अनेक दशके घालवली आहेत. एएमआय लॅब्जच्या पायाभूत सुविधांमध्ये पहिल्याच आर्किटेक्चरल निर्णयांपासून हे कौशल्य आणल्यामुळे प्रत्येक रॅक, प्रत्येक इंटरकनेक्ट, प्रत्येक स्टोरेज आणि कूलिंग प्रणाली एआय युगासाठी आवश्यक वर्कलोड्स आणि अर्थशास्त्र लक्षात घेऊन डिझाइन केली जाते,” असे ओएक्सएमआयक्यू लॅब्जचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजा कोडुरी यांनी सांगितले.





