तुमच्या आवडत्या हॅण्डलूम कपडे धुणे आणि सांभाळण्याच्या योग्य पद्धती जाणून घ्या!

By: Editor_Manas

On: Tuesday, March 17, 2026 12:32 PM

Google News
Follow Us

आपल्या देशात हॅण्डलूमची वस्त्रे परंपरांगत वापरली जातात. यात महाराष्ट्रातील पैठणी, गुजरात आणि राजस्थान येथील बांधणी, लखनऊची चिकनकरी, केरळचे कासावू, कर्नाटकचे म्हैसूर सिल्क, तेलंगणाचे पोचमपल्ली इकत आणि आसामच्या मुगा सिल्कसारख्या अनेक कलाकुसरींचा समावेश आहे. हॅण्डलूमचे कपडे नाजूक असल्याने त्यांची देखभाल करण्याबाबत अनेकांच्या मनात भीती असते. परिणामी, हॅण्डलूमचे कपडे वारंवार वापरण्यासाठी लोक कचरतात. ही गौरवशाली परंपरा टिकवण्यासाठी या कपड्यांची घरी योग्य प्रकारे काळजी घ्यायला हवी. गोदरेज एन्टरप्रायजेस ग्रुप अप्लायन्सेस बिझनेसचे वॉशिंग मशीन विभागाचे प्रमुख मनीष शर्मा यांनी आपल्या आवडत्या हॅण्डलूम कपड्यांचे आयुष्य वाढवण्यासाठी आणि त्यांची चमक टिकवून ठेवण्यासाठी वॉशिंग मशीनमध्ये धुताना काही सोप्या टिप्स शेअर केल्या आहेत.

कपड्याच्या प्रकारानुसार वर्गीकरण करुन धुवा

हातमागावर तयार केलेल्या कपड्यांमध्ये वैविध्यता असते. प्रत्येक कापडाची विणकामाची पद्धत, धाग्यांची जाडी आणि रंगाचे तंत्र वेगळे असते. हे कपडे नाजूकपणे हाताळावे लागतात. कापडाचा पोत समजून घेतल्यास या कपड्यावरील चमक दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी उपाययोजना करता येतात. म्हणून कापडाचा पोत समजणे ही पहिली मह्त्त्वाची पायरी असते. अगोदर कपड्यावरील केअर लेबल वाचा. कपडे धुण्यापूर्वी हा लेबल वाचायचा असतो. सर्वच हातमाग वस्त्रे मशीनमध्ये धुता येत नाहीत. नक्षीकाम केलेल्या आणि रंग जाण्याची शक्यता असतेल्या कपड्यांची विशेष काळजी घ्यावी लागते.

वॉशिंगमशीनमध्ये भरमसाठ कपडे टाकू नका

व़ॉशिंगमशीनच्या ड्रममध्ये पुरेशी जागा असेल तर हातमागाच्या कपड्यांना व्यवस्थित धुण्यासाठी जागा मिळते. या कपड्यांचे सौंदर्य टिकते. वॉशिंगमशीनमध्ये मर्यादेपेक्षा जास्त कपडे भरल्यास कपडे एकमेकांमध्ये गुंतून अडकतात. कपड्यांवर सुरकुत्या येताता, कित्येकदा घर्षणामुळे कपड्यांचे धागे कमकुवत होतात. हातमागाचे कपडे स्वतंत्र धुवावेत. इतर हलक्या कपड्यांसोबत हातमागाचे कपडे धुणे कधीही सोयीस्कर ठरते. वॉशिंगमशीनमध्ये कपड्यांना पुरेशी जागा मिळाल्यास कापडाच्या सुतावर ताण येत नाही. कपड्याची मूळ रचना आणि पोत दीर्घकाळ टिकण्यास मदत होते. 

साधे पाणी आणि सौम्य डिटर्जंटचा वापर करा

हॅण्डलूमच्या कपड्यांचे आयुष्य वाढवण्यासाठी हे कपडे धुताना खास काळजी घ्यावी लागते. कपडे धुताना पाण्याचे तापमान जास्त नसावे. सौम्य डिटर्जंटचा वापर करावा. गरम पाण्याचा वापर केल्यास या कपड्यातील नैसर्गिक धागे कमकुवत होतात. यामुळे कपडा आकसण्याची किंवा त्याचा रंग फिका पडण्याची दाट शक्यता असते. कपडे धुण्यासाठी २० ते २५ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या पाण्याचा वापर करावा. बाजारात मिळणारे तीव्र डिटर्जंट आणि ब्लीच हॅण्डलूम कापड्यासाठी अत्यंत घातक असतात. त्याऐवजी सौम्य डिटर्जंट वापरल्यास कापडाचे धागे सुरक्षित राहतात. रंगही टिकून राहतो.

वॉशिंगमशीनमधील जेंटल वॉशचा वापर करा

हॅण्डलूम कापडांची रचना अतिशय नाजूक असते. या कपड्यांवरील वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन अतिशय काळजीपूर्वण धुणे गरजेचे असते. वॉशिंगमशीनमध्ये हातमागाचे कपडे धुताना नेहमीच जेंटल-वॉश किंवा डेलिकेट मोडची निवड करा. या सुविधेमुळे मशीनमधील कपड्यंची हालचाल संथगतीने होते. कपडे हळुवारपद्धतीने धुतले जातात. कपड्याच्या धाग्यांवर ताण येत नाही. विणकाम सुरक्षित राहते. मशीनच्या वेगाने धावणा-या चक्रामुळे कपडे खराब होण्याचा किंवा फाटण्याचा धोका टाळता येतो. ही खबरदारी बाळगल्यास हातमागाच्या कपड्यांचा मूळ पोत आणि सौंदर्य दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते.

कपडे वाळवताना काळजी घ्या

हॅण्डलूम कापड धुतल्यानंतर वाळवतानाही आवश्यक काळजी घ्यावी लागते. कपडे धुतल्यानंतर अतिरिक्त पाणी काढताना जोरात पिळता कामा नये. अन्यथा कापडाची विणकाम बिघडू शकते. नाजूक धाग्यांवर ताण येऊ शकतो.  फ्रंट लोड वॉशिंगमशीनमधील जेंटल स्पिन सायकलचा वापर करावा. या मशीनमधील जेंटल स्पिन कमी आरपीएमवर फिरते. यामुळे कापडाच्या रचनेला हानी पोहोचत नाही. कपड्यातील ओलावा टिकून राहतो. हॅण्डलूम कपडे नेहमीच हवेशीर ठिकाणी आणि सावलीत वाळत घालावेत. प्रखर सूर्यप्रकाशात कपडे वाळत घातल्यास कपड्यांचा रंग फिका पडतो. कालांतराने धागे कमकुवत होतात. हा लहानशा गोष्टींचे पालन केल्यास तुमच्या आवडत्या हॅण्डलूमच्या कपड्यांचे सौंदर्य अनेक वर्ष टिकून राहील.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता हॅण्डलूमच्या कपड्यांची काळजी घेणे पूर्वीपेक्षाही अधिक सोपे झाले आहे. या पद्धतीही विश्वासार्ह मानल्या जातात. कपडे धुण्याच्या

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now