योग्‍य प्रकारची मॉस्किटो रिपेलेंट अगरबत्ती कशाप्रकारे निवडावी; सचिव जयंत देशपांडे

By: Editor_Manas

On: Friday, March 13, 2026 6:29 PM

Google News
Follow Us

भारतातील अनेक घरांमध्ये डासांचा त्रास वाढला की संरक्षणावर अधिक भर दिला जातोमॉस्किटो रिपेलेंट अगरबत्ती घर सुरक्षित ठेवण्यासाठी एक सोयीचे आणि परिचयाचे साधन म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरले जातेपणअधिकृत आणि कायदेशीर उत्पादनांसह अनेक बेकायदेशीर आणि बनावट अगरबत्ती देखील बाजारपेठेत आल्या आहेतयामुळे ग्राहकांसाठी योग्य प्रकारची अगरबत्ती निवडणे आता अत्यंत महत्त्वाचे आहेमाहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी खालील सोपी चेकलिस्ट तुम्हाला मदत करेल:

सरकारकडून मिळालेली मंजूरी (सीआयआर क्रमांकतपासा

मॉस्किटो रिपेलेंट अगरबत्तीची गणना कीटकनाशक वर्गात केली जातेत्यामुळेकृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत असलेल्या सेंट्रल इन्सेक्टिसाइड्स बोर्ड अँड रजिस्ट्रेशन कमिटी (सीआयबीआरसी)कडून त्यांची मंजूरी मिळणे अनिवार्य असते. मंजूर झालेल्या उत्पादनांच्या पाकिटावर सीआयआर (सेंट्रल इन्‍सेक्टिसाइड रजिस्‍ट्रेशन) क्रमांक असतोहा क्रमांक खात्री देतो कीसंबंधित उत्पादनाची सुरक्षा आणि परिणामकारकतेसाठी कठोर चाचण्या घेण्यात आल्या आहेतया चाचण्यांमध्ये उत्पादनाच्या त्वचाडोळे आणि श्‍वसनसंस्थेवर होणाऱ्या परिणामांचे मूल्यांकन समाविष्ट असतेगुडनाइट अगरबत्ती सारखे नामांकित ब्रँड्स हा सीआयआर क्रमांक त्यांच्या पाकिटावर स्पष्टपणे दाखवतात. वैध सीआयआर क्रमांक नसलेली उत्पादने नियामक प्राधिकरणांकडून तपासली गेलेली नाहीत असे मानले जाते आणि अशा उत्पादनांच्या बाबतीत ग्राहकांच्या सुरक्षिततेची कोणतीही हमी देता येत नाही.

हर्बल‘ किंवा ‘नॅच्‍युरल‘ दाव्यांबाबत दिशाभूल होऊ नका

अनेक स्वस्त मॉस्किटो रिपेलेंट अगरबत्ती हर्बल‘ किंवा नॅच्‍युरल‘ अशा शब्दांचा वापर करून विकल्या जातातयामुळे ग्राहकांना ही उत्‍पादने अधिक सुरक्षित आणि अस्सल असल्‍याचे वाटतेपणअशा मार्केटिंगच्या दाव्यांना सरकारी मंजूरीचा पर्याय समजू नका. बाजारपेठेत उत्पादनाची मांडणी कशीही केली असलीतरी कोणत्याही कीटकनाशक अगरबत्तीची सरकारी प्राधिकरणांकडे नोंदणी होणे अनिवार्य असतेग्राहकांनी मार्केटिंगच्या भाषेवर विश्वास ठेवण्याऐवजी उत्पादनाच्या अधिकृत नोंदणी तपशीलांवर अधिक भर दिला पाहिजे.

उत्पादनात वापरले जाणारे घटक/केमिकल समजून घ्या

उत्पादनात कोणते सक्रिय घटक वापरले आहेतहे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहेसरकारने काही अगरबत्त्यांवर छापे टाकले असतात्यामध्ये बेकायदेशीर किंवा अनधिकृत घटकांचा वापर होत असल्याचे आढळले आहेउदाहरणार्थकंफर्ट‘ सारख्या उत्पादनांमध्ये मर्यादेपेक्षा जास्त डायमेफ्लुथ्रिनचा वापर झाल्याचे दिसून आलेतसेच स्लीपवेलमध्ये मेपरफ्लुथ्रिन आढळलेजेथे या फॉरमॅटसाठी मंजूरी नव्हती. मॉस्किटो रिपेलेंट अगरबत्तीमध्ये रिनोफ्लुथ्रिन सारख्‍या घटकांचा वापर असावा, ज्यांना अधिकृत मंजूरी आणि नोंदणी मिळाली आहेग्राहकांनी उत्पादनाच्या पॅकेजिंगवर दिलेली माहिती काळजीपूर्वक तपासावी आणि मंजूर सक्रिय घटकांचा स्पष्ट उल्लेख नसलेली उत्पादने खरेदी करणे टाळावे.

अत्‍यंत स्‍वस्‍त दरात उपलब्‍ध असलेल्‍या उत्पादनांबाबत सावध राहा

परवडणाऱ्या किमतीत वस्तू मिळणे महत्त्वाचे असलेतरी असामान्यपणे कमी किंमत म्‍हणजे त्या उत्पादनासंदर्भात नियमांचे पालन न करण्याचे लक्षण असू शकतेअनेकदा स्थानिक बाजारपेठेत अवैध मॉस्किटो रिपेलेंट अगरबत्त्या अतिशय स्वस्त किमतीत विकल्या जातात. सरकारी नियमांच्या चौकटीबाहेर तयार केली जाणारी उत्‍पादने सरकारद्वारे ठरवून दिलेल्या सुरक्षा मानकांची पूर्तता करत नाहीतम्‍हणून उत्‍पादन खरेदी करताना फक्त किमतीकडे न पाहता सरकारी मंजूरी असल्‍याची देखील तपासणी करावी.

लेबलवरील माहितीची पारदर्शकता तपासा

कायदेशीर नियमांचे पालन करणाऱ्या उत्पादनांच्या पाकिटावर उत्पादकाचे नावसक्रिय घटकनोंदणी क्रमांक आणि वापरण्याबाबत सूचना ही माहिती स्पष्टपणे दिलेली असते. लेबलवरील ही पारदर्शकता म्‍हणजे उत्पादन सरकारी नियमांचे पालन करत असल्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहेही माहिती नसलेली उत्पादने शोधणे कठीण असते आणि त्यांना कोणतीही सरकारी मंजूरी नसण्‍याची शक्यता असते.

भारतामध्ये डासांमुळे होणारे आजार आजही मोठे आव्हान आहेतअशा वेळी डासांपासून संरक्षणासाठी योग्य उत्पादनाची निवड करणे अत्यंत आवश्यक आहेसरकारी मंजूरी आणि प्रमाणित घटकांची साधी तपासणी करून आपण आपल्या घरामध्ये फक्त शासनाने मान्यता दिलेल्या मॉस्किटो रिपेलेंट अगरबत्तीचा वापर होत असल्याची खात्री करू शकतो. बेकायदेशीर किंवा अनधिकृत अगरबत्तीवर आपला पैसा वाया घालवू नकाखरेदी करण्यापूर्वी सावध राहा आणि घरामध्‍ये मॉस्किटो रिपेलेंट अगरबत्ती वापरताना काळजी घ्यामाहितीपूर्ण निर्णय प्रभावी आणि कायदेशीर संरक्षणाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026