‘टाटा भारत YUVAi हॅकथॉन’ची इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये अभूतपूर्व कामगिरी

By: Editor_Manas

On: Friday, February 20, 2026 7:09 PM

Google News
Follow Us

नवी दिल्ली, भारत, फेब्रुवारी २०२६: ‘टाटा भारत YUVAi हॅकेथॉन’ या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाने कोडिंगचे ज्ञान नसलेल्यांसाठी भारतातील सर्वात मोठी हॅकथॉन म्हणून नवा इतिहास रचला. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर डिजिटल निर्मिती शक्य करू शकते, याचा हा उपक्रम एक जिवंत पुरावा बनला आहे. हा अशाप्रकारचा हा पहिलाच अनोखा उपक्रम असून यामध्ये कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांच्या १,८०० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एकाच व्यासपीठावर आणले गेले, ज्यांनी अवघ्या ९० मिनिटांत प्रत्यक्ष काम करणारे डिजिटल ॲप प्रोटोटाइप तयार केले. कोडिंगचा कोणताही पूर्वानुभव नसतानाही, या स्पर्धकांनी भारतीय भाषांमध्ये काम करणाऱ्या एआय टूल्सची मदत घेतली; ज्यामुळे समस्येची ओळख पटवण्यापासून ते त्यावर प्रत्यक्ष उपाय (ॲप) तयार करण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी अतिशय कमी वेळात यशस्वीरीत्या पूर्ण केला.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारत सरकारचे माननीय रेल्वे, माहिती व प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री. अश्विनी वैष्णव उपस्थित होते. त्यांच्यासोबतच टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. के. कृतिवासन यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

यामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आरोग्यसेवा, शिक्षण, कृषी आणि नागरी जीवन यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील आव्हानांची निवड केली. एआय-सक्षम टप्प्याटप्प्याने काम करण्याच्या पद्धतीचा वापर करून, विद्यार्थ्यांनी समस्यांवर संशोधन केले, उपायांवर विचारमंथन केले आणि अवघ्या ९० मिनिटांत १,५०० ॲप प्रोटोटाइप्स तयार केले, जे त्यांच्या स्वतःच्या समुदायातील समस्यांचे निराकरण करतात. ही हॅकथॉन सिद्ध करते की, एआयच्या मदतीने आता कोणीही नवीन तंत्रज्ञान आणि नवनवीन गोष्टींची निर्मिती करू शकतो. यामुळे कला आणि वाणिज्य यांसारख्या बिगर-तांत्रिक विषयांचे विद्यार्थी आता केवळ तंत्रज्ञानाचा वापरच करणार नाहीत, तर स्वतःच्या गरजेनुसार तंत्रज्ञान विकसित करू शकतील.

टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. के. कृतिवासन म्हणाले, “भारताचे डिजिटल भविष्य हे केवळ अभियांत्रिकी क्षेत्रापलीकडील प्रतिभा शोधण्यावर आणि त्यांना वाव देण्यावर अवलंबून आहे. टाटा YUVAi हॅकेथॉनमध्ये १८०० बिगर-अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी एकत्र येत डिजिटल ॲप प्रोटोटाइप्स तयार केले, हे याच ध्येयाच्या दिशेने उचललेले एक मोठे पाऊल आहे. हे डिजिटल समावेशाप्रती (Digital Inclusion) टाटा समूहाची वचनबद्धता दर्शवते, जिथे संधी ही कोणत्याही विशिष्ट पार्श्वभूमी, विषय किंवा भाषेपुरती मर्यादित नाही. हा आपल्या देशातील अशा प्रकारचा सर्वात मोठा ‘सिंगल-सेशन लर्निंग’ उपक्रम असून, १० लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या एका राष्ट्रीय चळवळीची ही सुरुवात आहे. हे अभियान विद्यार्थ्यांना एआय टूल्सच्या मदतीने त्यांच्या कल्पनांचे रूपांतर प्रत्यक्ष उपायांमध्ये करण्यासाठी सक्षम बनवेल.”

टाटा भारत YUVAi हॅकथॉनचा मुख्य उद्देश भारतातील तरुणांना भविष्यातील डिजिटल तंत्रज्ञानात पारंगत करणे हा आहे. भारतात ६२.३% महाविद्यालयीन विद्यार्थी कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांमध्ये शिक्षण घेतात. ही अनोखी मोहीम तंत्रज्ञानातील तांत्रिक अडचणी दूर करू इच्छिते, जेणेकरून हे विद्यार्थीदेखील स्वतःच्या भाषेत सोपी एआय टूल्स वापरून नवनिर्मिती करू शकतील. भारताचे पुढील १० लाख ‘डिजिटल क्रिएटर्स’ तयार करण्याचा मार्ग मोकळा करणे, हे या उपक्रमाचे ध्येय आहे.

भारत मंडपम येथे आयोजित या दिमाखदार सोहळ्याने देशभरात सुरू असलेल्या एका राष्ट्रव्यापी मोहिमेला यशाच्या शिखरावर पोहोचवले. गेल्या

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now