रॅडिसन हॉटेल ग्रुप (RHG) आणि एमबीडी ग्रुप यांनी आज मास्टर फ्रँचायझी कराराअंतर्गत दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. भारतातील परस्पर संमतीने निश्चित केलेल्या ठिकाणी रॅडिसन कलेक्शन आणि रॅडिसन रेड या RHG च्या लक्झरी आणि लाइफस्टाइल ब्रँड्सच्या वाढीस पाठबळ देण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे. RHG च्या जागतिक ब्रँड मानके आणि प्रशासन चौकटीवर आधारित ही भागीदारी देशातील लक्झरी हॉस्पिटॅलिटी आणि लाइफस्टाइल विभागाचा विस्तार करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या सहकार्याद्वारे RHG च्या जागतिक ब्रँड प्लॅटफॉर्म्स आणि एमबीडी ग्रुप यांच्या विकास व कार्यकारी कौशल्याचा संगम साधला जाईल. RHG भारतात या ब्रँड्सच्या वाढीसाठी विविध माध्यमे आणि धोरणात्मक संबंधांद्वारे प्रयत्न सुरू ठेवेल.
धोरणात्मक भागीदारीची रूपरेषा
या धोरणात्मक भागीदारीअंतर्गत एमबीडी ग्रुप भारतभर रॅडिसन कलेक्शन आणि रॅडिसन रेड हॉटेल्सच्या विकासाला पाठबळ देईल. RHG चे स्वतंत्र विकास उपक्रम आणि व्यापक भागीदार नेटवर्कसोबत, एमबीडी ग्रुप निश्चित आणि परस्पर संमतीने ठरवलेल्या ठिकाणी दोन्ही ब्रँड्ससाठी व्यवसाय विकास, व्यवस्थापन आणि फ्रँचायझी कार्येही पार पाडेल. त्यायोगे RHG च्या प्रमुख बाजारपेठांपैकी एक असलेल्या भारतातील वाढीच्या धोरणाला अधिक बळकटी मिळेल.
रॅडिसन ब्लू एमबीडी नॉयडाचे रॅडिसन कलेक्शन एमबीडी मध्ये रूपांतर
या धोरणात्मक भागीदारीचा एक भाग म्हणून, वैशिष्ट्यपूर्ण रॅडिसन ब्लू एमबीडी हॉटेल नॉयडा, हे पहिले पंचतारांकित हॉटेल ब्रँडच्या जागतिक मानकांनुसार सर्वंकष अपग्रेडनंतर रॅडिसन कलेक्शन एमबीडी मध्ये रूपांतरित होईल. हे हॉटेल भारतातील RHG च्या पोर्टफोलिओमधील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या मालमत्तांपैकी एक आहे. या पुनर्स्थापनेतून भारतातील लक्झरी पोर्टफोलिओ अधिक बळकट करण्याच्या RHG च्या धोरणाचे प्रतिबिंब दिसून येते. त्यामध्ये प्रीमियम ब्रँड स्तरातील प्रस्थापित लँडमार्क हॉटेल्सना उन्नत करणे तसेच व्यापक भागीदार नेटवर्कद्वारे रॅडिसन कलेक्शन आणि रॅडिसन रेड यांचा सातत्यपूर्ण विकास समाविष्ट आहे.
भारताच्या लक्झरी आणि लाइफस्टाइल हॉस्पिटॅलिटी विभागातील पुढील टप्प्यातील वाढ
“भारताची प्रीमियम हॉस्पिटॅलिटी बाजारपेठ सातत्याने मजबूत वाढ दर्शवत आहे, तसेच समकालीन, डिझाइन-केंद्रित लाइफस्टाइल अनुभवांची मागणीही वाढत आहे. ही धोरणात्मक भागीदारी आमच्या व्यापक विकास उपक्रमांसोबत प्रमुख भारतीय बाजारपेठांमध्ये रॅडिसन कलेक्शन आणि रॅडिसन रेडचा विस्तार करण्याची आमची क्षमता अधिक बळकट करते. एमबीडी ग्रुप हा दोन दशकांहून अधिक काळ रॅडिसन हॉटेल ग्रुपचा विश्वासार्ह भागीदार राहिला आहे आणि आम्ही एकत्रितपणे प्रवाशांच्या बदलत्या अपेक्षांना प्रतिसाद देणारी वेगळी ओळख असलेली हॉटेल्स निर्माण करत या ब्रँड्सचा विस्तार करण्यास सज्ज आहोत. त्यातून भारताप्रती असलेली आमची दीर्घकालीन बांधिलकी दृढ करत आहोत,” असे रॅडिसन हॉटेल ग्रुपच्या दक्षिण आशिया विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल शर्मा म्हणाले.
“हे सहकार्य भारतातील प्रीमियम हॉस्पिटॅलिटी विभागातील आमच्या विकास गतीला पाठबळ देते. एमबीडी टीमच्या सहाय्याने आमचे विकास प्रयत्न आमच्या मजबूत वाढ क्षमतांच्या जोडीला अधिक संधी शोधण्यास मदत करतील. स्पष्ट अॅसेट-लाइट धोरणावर लक्ष केंद्रित करून आम्ही दीर्घकालीन ब्रँड मूल्य टिकवून ठेवत धोरणात्मक विस्तारासाठी सक्षम स्थितीत आहोत,” असे रॅडिसन हॉटेल ग्रुपच्या दक्षिण आशिया विकास विभागाचे वरिष्ठ संचालक दवाशिष श्रीवास्तव यांनी सांगितले.
धोरणात्मक दृष्टीकोन आणि विकास आराखडा
या सहयोगाविषयी भाष्य करताना एमबीडी ग्रुपच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालिका सोनिका मल्होत्रा कंधारी म्हणाल्या, “ही भागीदारी एमबीडीच्या हॉस्पिटॅलिटी प्रवासातील एक निर्णायक धोरणात्मक टप्पा आहे. भागीदारीच्या पहिल्या दशकात प्रामुख्याने अॅसेट-लाइट मॉडेलद्वारे रॅडिसन कलेक्शन एमबीडी आणि रॅडिसन रेड एमबीडी या सह-ब्रँडेड हॉटेल्स अंतर्गत 50 हॉटेल्स सादर करण्याचे लक्ष्य आहे. एमबीडीचे प्रॉप बुक एक्स्पोजर सुमारे 25% असेल. लक्झरीवर लक्ष केंद्रित करणारे रॅडिसन कलेक्शन एमबीडी अत्यंत विचारपूर्वक स्थाननिश्चिती करेल, तर लाइफस्टाइल विभागाला लक्ष्य करणारे रॅडिसन रेड एमबीडी अधिक आक्रमक विस्तार साध्य करेल. एमबीडी आपल्या संपूर्ण भारतातील ब्रँड स्थानाचा लाभ घेईल, कार्यकारी उत्कृष्टता आणि देशातील सर्व रॅडिसन हॉटेल्समधील पहिल्या क्रमांकाची नेतृत्व कामगिरी स्थानाचा लाभ घेईल.”
सोनिका यांनी पुढे सांगितले की नियोजित पोर्टफोलिओमध्ये अंदाजे 80% व्यवस्थापित आणि फ्रँचायझी हॉटेल्स आणि 20% मालकी हक्काची मालमत्ता असे मिश्रण अपेक्षित आहे. त्यातून विस्तारक्षम, अॅसेट-लाइट विस्तारावर असलेला सामायिक भर दिसून येतो. हे सहकार्य रॅडिसन हॉटेल ग्रुपची जागतिक ब्रँड ताकद आणि एमबीडी ग्रुपची स्थानिक बाजारपेठेची सखोल समज आणि कामकाज कौशल्य एकत्र आणते. याचा उद्देश उच्च दर्जाच्या लक्झरी आणि डिझाइन-केंद्रित लाइफस्टाइल हॉस्पिटॅलिटीच्या वाढत्या मागणीची पूर्तता करणे आहे.”
डिझाइन तत्त्वज्ञान आणि ब्रँड स्थाननिश्चिती
एमबीडी ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका मोनिका मल्होत्रा कंधारी म्हणाल्या, “आज लक्झरीची व्याख्या सौंदर्यपूर्ण सुधारणा, सादरीकरण आणि सर्वसमावेशक अनुभवांतून होते. एमबीडीमधील आमच्या प्रकल्प डिझाइन आणि व्यवस्थापन कौशल्याद्वारे आम्ही अतिथी अनुभव उंचावणारी डिझाइन उत्कृष्टता पुरविण्याचा प्रयत्न करतो. रॅडिसन कलेक्शन एमबीडी मधून कालातीत, मुळाशी जोडलेले आणि निवडक लक्झरी प्रतिबिंबित होईल तर रॅडिसन रेड एमबीडी धाडसी, खेळकर आणि सामाजिकदृष्ट्या प्रेरित डिझाइन सादर करेल. एमबीडीच्या समृद्ध सांस्कृतिक कथा भारतातील लक्झरी आणि लाइफस्टाइल हॉस्पिटॅलिटीची नव्याने व्याख्या करतील. शिक्षण असो वा हॉस्पिटॅलिटी, एमबीडीने सर्वोच्च कामगिरी प्रदर्शित केली आहे. या भागीदारीद्वारे आम्ही सर्वात आकर्षक पद्धतीने जागतिक सहयोगातून मूळचा भारतीय असलेला पहिल्या क्रमांकाचा लक्झरी आणि लाइफस्टाइल ब्रँड बनण्याचे उद्दिष्ट ठेवतो.”
परंपरा आणि मूल्याधिष्ठित भागीदारी
“RHG सोबतचा आमचा सहयोग नेहमीच विश्वास आणि गुणवत्तेप्रती सामायिक बांधिलकीवर आधारित राहिला आहे. हा विस्तारित सहयोग आमचे संस्थापक श्री. अशोक कुमार मल्होत्रा यांनी कल्पना केलेल्या सत्यता आणि उत्कृष्टतेच्या सातत्यपूर्ण ध्यासावर आधारित संस्था उभारणे आणि संस्कृती व मूल्यतत्वे यांच्याशी तडजोड न करता नेतृत्व स्थान निर्माण करणे या दीर्घकालीन परंपरेचे प्रतिबिंब आहे. भारतीय हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात अत्यंत अर्थपूर्ण काम करण्यास आणि भारताला सर्वाधिक पसंतीचे स्थळ बनविण्यास आम्हाला खरोखर आनंद होत आहे,” असे एमबीडी ग्रुपच्या अध्यक्षा, सतीश बाला मल्होत्रा यांनी सांगितले.
देशाच्या हॉस्पिटॅलिटी परिसंस्थेच्या सातत्यपूर्ण प्रगती आणि बळकटीकरणात योगदान देत मालक आणि भागीदारांसाठी दीर्घकालीन शाश्वत मूल्य सादर करत रॅडिसन हॉटेल ग्रुप आणि एमबीडी ग्रुप एकत्रितपणे भारतभर अत्याधुनिक लक्झरी आणि लाइफस्टाइल स्थळे घडविण्यास कटिबद्ध आहेत. तसेच बाजारपेठेतील RHG च्या स्वतंत्र विकास उपक्रमांना पूरक ठरत आहेत.









