कल्याण ज्वेलर्सचे विशेष गुढीपाडवा कॅम्पेन, पूजा सावंतसोबत साजरा केला जात आहे परंपरेपलीकडील नात्यांचा अनोखा उत्सव

By: Editor_Manas

On: Thursday, March 19, 2026 8:28 AM

Google News
Follow Us

राष्ट्रीय मार्च २०२६: भारतातील एक अतिशय विश्वासार्ह आणि जागतिक स्तरावर नावाजला जाणारा ज्वेलरी ब्रँड ‘कल्याण ज्वेलर्स’ने गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपली ब्रँड ॲम्बेसेडर पूजा सावंत हिच्यासोबत एका हृदयस्पर्शी डिजिटल मोहिमेची सुरुवात केली आहे. नव्या आरंभाचा उत्साह, त्यासोबतच काळानुरूप बदलत जात असलेली कुटुंब व्यवस्था आणि नातेसंबंधातील दृढत्वाचा सुंदर सोहळा यामध्ये साजरा केला जात आहे.

महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मंगल सण ‘गुढीपाडवा’ समृद्धी, चैतन्य आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरांचे प्रतीक आहे. सणाचा हाच उत्साह द्विगुणित करत, कल्याण ज्वेलर्सची ही मोहीम कुटुंबातील नाती काळानुरूप कशी बहरत जातात, याची एक हृदयस्पर्शी कथा सांगते. कुटुंबातील ‘वहिनी’चा ‘बहिण’ होण्यापर्यंतचा प्रवास—ममत्व, एकत्र घालवलेले क्षण आणि वाढत जाणारी जवळीक—अतिशय सुंदररित्या गुंफण्यात आली आहे.

कुटुंबातील सगळ्यांची सणाच्या तयारीची लगबग, गप्पांचे, हसण्याचे आवाज, मांगल्याने भारलेले वातावरण अशा पार्श्वभूमीवर ही फिल्म उलगडत जाते. कल्याण ज्वेलर्सच्या दागिन्यांचे सौंदर्य आणि तेज या आनंदाला अधिकच सोनेरी बनवते. या सुंदर क्षणांमध्ये एक हृदयस्पर्शी वळण येते—जेव्हा वहिनी आपल्या हाताने पूजाला नथ घालते. हा केवळ साजशृंगार नाही, तर दोन मनांतील जवळीक आणि वहिनी ‘बहीण’ होण्याचे एक गोड प्रतीक बनून ते आपल्या मनाला स्पर्श करते.

परंपरेला आधुनिकतेचा साज चढवणाऱ्या या फिल्मचा समारोप दागिन्यांच्या भेटीने होतो, असे दागिने जे शब्दांच्या पलीकडले प्रेम व्यक्त करतात. जुन्या रूढी-परंपरांच्या पलीकडे जाऊन आपुलकी व विश्वासावर फुलत जाणाऱ्या नात्यांचा सन्मान करतात. आपला वैभवशाली वारसा जपत असताना, काळानुरूप बदलत जाणाऱ्या नात्यांची सुंदर आणि भावस्पर्शी कथा कल्याण ज्वेलर्सने यामध्ये सांगितली आहे.

शुद्धतेची हमी आणि विश्वासाची परंपरा जपणाऱ्या कल्याण ज्वेलर्सच्या दागिन्यांसोबत तुम्हाला मिळते ४-लेवल अश्युरन्स सर्टिफिकेट. शुद्धतेचे प्रमाणपत्र, लाईफटाईम फ्री मेंटेनन्स आणि बाय-बॅकचे पारदर्शक नियम यामुळे कल्याण ज्वेलर्समध्ये तुम्ही मिळवू शकाल मनाजोगत्या खरेदीचा आनंद अगदी निर्धास्तपणे!

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गुढी उभारत असताना कल्याण ज्वेलर्स साजरा करत आहेत काळानुरूप वृद्धिंगत होणाऱ्या सुवर्ण नात्यांचा उत्सव. आपल्या घरात आपण ज्या सुंदर आणि अनपेक्षित नात्यांना आपुलकीने जपतो, त्या अनमोल बंधांचा हा गौरव आहे.

डिजिटल कॅम्पेन व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक

ब्रँड, त्यांची कलेक्शन्स आणि ऑफर्सविषयी अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या.

https://www.kalyanjewellers.net/

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

April 21, 2026

Malabar मलबार

April 20, 2026

April 18, 2026

April 17, 2026

April 16, 2026

April 16, 2026