निर्भय, सुरक्षित संवाद व मानवी विचारशक्तीला चालना देणाऱ्या ‘गुरुचॅट्स’चे ‘क्वांटमफोर्स’तर्फे लोकार्पण

By: Editor_Manas

On: Friday, February 20, 2026 9:18 PM

Google News
Follow Us

सॅनफ्रान्सिस्को (अमेरिका)/बंगळुरू (भारत)/ पुणे: माणसाच्या विचारशक्तीला, एकाग्रतेला आणि संशोधक वृत्तीला चालना देण्याऱ्या ‘गुरुचॅट्स’ या डिजिटल संवाद मंचाचे दूरदृश प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले. क्वांटमफोर्स इन्कच्या वतीने या ‘एआय’ आधारित प्रणालीची निर्मिती करण्यात आली असून, भारतासह अमेरिकेत ‘गुरुचॅट्स’द्वारे मुक्त, निर्भय व सुरक्षित संवाद करता येणार आहे, अशी माहिती ‘क्वांटमफोर्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व संशोधक भूपेंद्र चौधरी यांनी दिली.

भूपेंद्र चौधरी म्हणाले, “गुरुचॅट्स हे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड आणि नॉन-रेकॉर्डेबल डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये संभाषण केवळ त्या सत्रापुरते मर्यादित राहते. डिजिटल संवादातील ‘रेकॉर्डिंग कल्चर’ आणि अति-स्वयंचलनाला पर्याय देण्याचा त्यामागील उद्देश आहे. तंत्रज्ञानामुळे संवाद अधिक कार्यक्षम झाला असला, तरी त्याने लक्ष केंद्रीकरण आणि बौद्धिक धैर्य कमी केले आहे. हा प्लॅटफॉर्म विद्यापीठे, कॉर्पोरेट नेतृत्व संघ, सल्लागार, शिक्षक, थिंक टँक आणि समुदाय गटांसारख्या उच्च-विश्वासाच्या वातावरणासाठी तयार करण्यात आला आहे, जिथे गोपनीय चर्चा आवश्यक असते. ‘कॉग्निटिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर’ म्हणून गुरुचॅट्स लक्ष, स्मरणशक्ती, विश्लेषण क्षमता आणि अभिव्यक्ती कौशल्य वाढवण्यासह मानवी विचार प्रक्रियेला प्रोत्साहन देते.”

या संवाद मंचाच्या निर्मितीमागे प्राचीन अथेन्समधील ‘निक्स’ या ऐतिहासिक ठिकाणाची प्रेरणा आहे. त्या ठिकाणी नागरिक निर्भयपणे सार्वजनिक चर्चा करत असत. त्याची कुठेही नोंद होत नाही. त्याच धर्तीवर आधुनिक डिजिटल जगात विश्वासार्ह व मुक्त संवादाची जागा निर्माण करण्याचा प्रयत्न या मंचातून करण्यात आला आहे. हा प्लॅटफॉर्म विश्वासार्ह, व्यावसायिक वातावरण निर्मिती करणारा आहे. कोणत्याही माहितीची चोरी, मोडतोड करण्याचा धोका यामध्ये राहणार नाही. कंपनी सुरक्षित संवाद क्षेत्रात विस्तार करत असताना अधिकृत माध्यमांद्वारे भागीदारीच्या संधी, संस्थात्मक परवाने आणि प्रारंभिक प्रवेश उपलब्ध करून देणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

कंपनीनुसार अमेरिका आणि भारत येथे एकत्रित लाँच करण्यामागे शैक्षणिक व बौद्धिक चर्चेची मजबूत परंपरा असलेल्या बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करण्याची रणनीती आहे. लाँचनंतर होणाऱ्या जागतिक परिषदेत शिक्षक, संस्थात्मक भागीदार आणि प्रारंभिक वापरकर्ते सहभागी होऊन खाजगी, उपस्थिती-आधारित संवादाच्या भविष्यासंदर्भात चर्चा करणार आहेत. सुरक्षित संवाद क्षेत्रात विस्तार करताना अधिकृत माध्यमांतून भागीदारी संधी, संस्थात्मक परवाने आणि अर्ली-ऍक्सेस सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, असे चौधरी यांनी सांगितले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now