‘एआय समिट’ मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन

By: Editor_Manas

On: Saturday, February 21, 2026 4:11 PM

Google News
Follow Us

पुणे: नवी दिल्ली येथे आयोजित एआय समिटमध्ये शांततेत आंदोलन करणाऱ्या भारतीय युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह अध्यक्ष उदय भानू चिब यांच्या अटकेच्या निषेधार्थ पुणे जिल्हा शहर युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. गुडलक चौकात झालेल्या आंदोलनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत भारतीय जनता पार्टी व पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यात आला. दरम्यान, आक्रमक झालेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

युवक काँग्रेसच्या प्रदेश प्रभारी शांभवी शुक्ल, प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, पुणे शहर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सौरभ अमराळे, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पवार यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रथमेश आबनावे म्हणाले, “भाजपकडून लोकशाही दाबण्याचे काम सुरु आहे. पंतप्रधान मोदी एप्सटिन फाईलवर बोलत नाहीत; माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकावर बोलत नाहीत. देशाची सुरक्षा आणि हित या दृष्टीने मोदी यांचे मौन गंभीर बाब आहे.”

उमेश पवार यांनी सांगितले की, युवक काँग्रेसच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांवर केलेली कारवाई निषेधार्ह आहे. आम्ही भाजप सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी इथे आंदोलन करत आहोत. काल ज्या पद्धतीने आमचे नेते उदय भानू चिब यांना कार्यालयात जाऊन अटक करण्यात आली, ते खूपच निषेधार्थ आहे.

सौरभ अमराळे म्हणाले, “पोलिसांचे बळ वापरून न्यायासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु, युवक कॉग्रेस हा अन्याय सहन करणार नाही. देशासाठी, न्यायासाठी आमचा लढा कायम सुरु राहील.”

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

LPG Gas Shorage

March 14, 2026

March 14, 2026

March 14, 2026

March 14, 2026

March 14, 2026

March 14, 2026