पुणे – गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ आणि ‘अवैध धर्मांतर’ या गंभीर समस्यांविरोधात कायदा करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जनआक्रोश मोर्चे काढले. त्यावेळी सरकारने या विषयाचे गांभीर्य ओळखून ‘लव्ह जिहाद’ विरोधात कठोर कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजही दुर्दैवाने या घटना थांबलेल्या नाहीत, उलट त्यांची तीव्रता आणि क्रूरता वाढतच चालली आहे. आता सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आली आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांप्रमाणे गुन्हेगाराला जन्मठेप शिक्षा देणारा कठोर आणि अजामीनपात्र स्वरूपाचा ‘लव्ह जिहाद’ व अवैध धर्मांतर विरोधी कायदा’ येत्या अधिवेशनात तात्काळ संमत करावा अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने राज्यशासनाकड़े केली आहे.
या दृष्टीने समितीने मा. मुख्यमंत्री, मा. गृहमंत्री यांच्याकड़े राज्यभरातील विविध जिल्ह्यातील एकूण ७५ हून अधिक ठिकाणी स्थानिक जिल्हा आणि तालुका प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतीनिधींमार्फत निवेदने दिली. पुणे जिल्ह्यांतही मध्ये मोठ्या संख्येने महिला व हिंदुत्वनिष्ठांनी एकत्रित येत निवेदनाच्या मार्फत वरील मागण्या केल्या आहेत.
पुणे जिल्ह्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला निवेदने देण्यात आली.
पुणे जिल्ह्यात विविध स्तरांवर या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून खालील ठिकाणी निवेदने सोपवण्यात आली :
१. आमदार भीमराव तापकीर : यांच्या कार्यालयात समितीच्या वतीने निवेदन देऊन या विषयाचे गांभीर्य मांडण्यात आले.
२. तळेगाव दाभाडे नगरपरिषद : नगराध्यक्ष श्री. संतोष दाभाडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारताना त्यांनी या विषयाचे समर्थन करत सांगितले की, “आजच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांना या संदर्भात मेल (ईमेल) पाठवून या मागणीचा पाठपुरावा करणार आहे.”
३. आमदार हेमंत रासने : यांच्या वतीने त्यांच्या कार्यालयातील सचिव श्री. अक्षय यांनी निवेदन स्वीकारले.
४. वडगाव महसूल विभाग : नायब तहसीलदार श्री. प्रकाश पिसाळ यांना निवेदन देऊन प्रशासकीय स्तरावरून शासनाकडे मागणी पोहोचवण्याची विनंती करण्यात आली.
५. आमदार सिद्धार्थ शिरोळे : यांच्या वतीने त्यांच्या कार्यालयातील व्यवस्थापक श्री. प्रताप गोरावा यांनी निवेदन स्वीकारले.
गेल्या दोन वर्षांपासून जनआक्रोश मोर्चे काढूनही लव्ह जिहादच्या घटनांमधील क्रूरता वाढतच आहे. “महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य आहे, जिथे परस्त्रीला मातेसमान मानले जाते. या भूमीत हिंदुभगिनी सुरक्षित राहण्यासाठी सरकारने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृती करावी,” अशी भावना हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद आणि अवैध धर्मांतर विरोधी’ कायदा तात्काळ करा !
By: Editor_Manas
On: Saturday, February 21, 2026 4:07 PM
aapka prahar, aapka prahar times, marathi news pune, mumbai pune rain, news of pune, prahaar, prahar, prahar janshakti, prahar protest pune, prahar sanghatana, prahar sanghatana news, prahar times, prahar times mumbra, protest in pune, pune, pune handicap protest, pune live news marathi, pune news, pune political news, pune prahar protest, pune protest, pune traffic news, pune traffic protest, rasta roko pune, road blockade pune, social welfare pune, stone pelting pune, unique protest pune, zilla parishad pune





