बालक-पालक प्रकल्पाचे रविवारी उद्घाटन

By: Editor_Manas

On: Friday, February 20, 2026 9:28 PM

Google News
Follow Us

पुणे: दिव्यांग मुले व त्यांच्या पालकांसाठी उमेद फाउंडेशनच्या पुढाकाराने उभारलेल्या बालक-पालक प्रकल्पाचे उद्घाटन येत्या रविवारी (ता. २२) सकाळी १० वाजता पौड, पुणे येथे होणार आहे. दिव्यांग मुले व त्यांच्या पालकांसाठी एकत्रित निवासव्यवस्था असलेला हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेश अण्णाजी तथा नानासाहेब जाधव यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे.

उमेद फाऊंडेशनच्या या प्रकल्पामुळे दिव्यांग मुलांना व त्यांच्या पालकांना मायेचा निवारा मिळणार आहे. प्रमुख मार्गदर्शक प्रतिभाताई केंजळे, जयंत पारखी, सीमा दाबके, भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह संस्थेचे सर्व देणगीदार, हितचिंतक, दिव्यांग विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती उमेद फाऊंडेशनचे अध्यक्ष राकेश सणस, सचिव लीना देवरे यांनी दिली.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now