अशोक लेलँडची पश्चिम भारतात मोठ्या विस्ताराची योजना 

पुणे, फेब्रुवारी 2026: हिंदुजा समूहाची भारतीय प्रमुख कंपनी आणि देशातील अग्रगण्य व्यावसायिक वाहन उत्पादक अशोक लेलँड महाराष्ट्र आणि पश्चिम भारतातील मोठ्या भागात  आपला मजबूत पाया अधिक बळकट करत आहे. प्रदेशातील भक्कम आर्थिक वाढ, वेगाने होणारा पायाभूत सुविधा विकास आणि वजनाने हलक्या व्यावसायिक वाहनांची (LCVs) वाढती मागणी यांचा लाभ घेण्याचा कंपनीचा उद्देश आहे. त्यायोगे सर्वोत्तम दर्जाची LCV उत्पादने व सेवा देण्याची आपली बांधिलकी आणखी मजबूत करत प्रदेशातील बाजारपेठेतील स्थान अधिक मजबूत होईल तसेच त्या भागातील विशिष्ट वाहतूक गरजा प्रभावीपणे पूर्ण करण्यास मदत होईल.

पश्चिम भारतात, अशोक लेलँड LCV व्यवसायाकडे सध्या 29 डीलर भागीदार, 130 सेवा कार्यशाळा आणि 350 हून अधिक ALTT’s (अशोक लेलँड ट्रेन्ड टेक्निशियन्स) आहेत. यामुळे दर 35 किलोमीटर अंतरावर सेवा उपलब्धता सुनिश्चित होते. पुढील एक वर्षात, कंपनी आपले सेवा जाळे वाढवून दर 25 किलोमीटर अंतरावर एक टचपॉइंट उपलब्ध करण्यासाठी कार्यरत आहे.

अशोक लेलँडच्या LCV व्यवसायाचे प्रमुख श्री. विप्लव शाह म्हणाले, “महाराष्ट्र आणि संपूर्ण पश्चिम प्रदेशातील LCV नेटवर्किंगचा विस्तार आमच्यासाठी गेम चेंजर ठरेल. आमच्या LCV श्रेणीतून मिळणारे सर्वोत्तम दर्जाचे मायलेज, पेलोड, लोडिंग एरिया, कम्फर्ट आणि विश्वसनीयता यांसोबतच आता आम्ही आमची सेवा पोहोच वाढवण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत आहोत. पश्चिम विभाग ही आमच्यासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ असल्यामुळे येथे आमचे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

अशोक लेलँड नाविन्यपूर्णता आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाढ साध्य करत असून, व्यावसायिक वाहन उद्योगातील आपले नेतृत्व अधिक दृढ करत आहे. वाढती बाजारपेठेतील हिस्सेदारी आणि हलक्या व्यावसायिक वाहनांचा मजबूत पोर्टफोलिओ यांच्या बळावर कंपनी पश्चिम भारतातील आपले स्थान अधिक सक्षम करण्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या सज्ज आहे. विविध उद्योगांच्या गरजांना अनुरूप वाहतूक उपायसुविधा पुरवून आणि राज्याच्या आर्थिक प्रगतीला पाठबळ देऊन अशोक लेलँड ग्राहक-केंद्रित गतिशीलतेत नवीन मापदंड प्रस्थापित करत आहे.

अशोक लेलँड आपला विस्तार आणि आपला ठसा वाढवत राहिल्याने, पश्चिम भारतातील ग्राहकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी उल्लेखनीय उत्पादने आणि सेवा सादर करण्याकरता कंपनी वचनबद्ध आहे. त्यातून LCV बाजारपेठेतील अग्रगण्य कंपनी म्हणून आपली भूमिका अधिक दृढ करत आहे.