Operation Sindoor नंतर पाकिस्तान Twin Strike च्या स्फोटांनी हादरलं; लष्कराचं वाहन क्षणात चक्काचूर, 14 सैनिकांचा मृत्यू; पाकिस्तानवर यावेळी भारत नव्हे तर कोणी केला हल्ला? (VIDEO)

By: Editor_Pratik

On: Thursday, May 8, 2025 3:03 AM

Operation Sindoor BLA Twin Strike on Pakistan
Google News
Follow Us

Operation Sindoor नंतर पाकिस्तान Twin Strike च्या स्फोटांनी हादरलं; लष्कराचं वाहन क्षणात चक्काचूर, 14 सैनिकांचा मृत्यू; पाकिस्तानवर यावेळी भारत नव्हे तर कोणी केला हल्ला? (VIDEO)

Pakistan was shaken by Twin Strike explosions after Operation Sindoor; Army vehicle destroyed in an instant, 14 soldiers killed; Who attacked Pakistan this time, not India? (VIDEO)

Operation Sindoor BLA Twin Strike on Pakistan : पाकिस्तानमध्ये असणाऱ्या 9 दहशतवादी तळांवर भारतानं हल्ला करत 90 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. या हल्ल्यानं बिथरलेला पाकिस्तान सावरत नाही, तोच या देशाला पुन्हा एकदा आणखी एका हल्ल्याला सामोरं जावं लागत आहे. ज्यामध्ये प्राथमिक माहितीनुसार पाकच्या 14 सैनिकांचाही मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पाकिस्तानवर भारतानं हल्ला केला नसून या देशाच्या आणखी एका शत्रूनं पाकिस्तानवर जीवघेणा वार केला आहे.

पाकिस्तानच्या लष्करी तळाला आणि इतर लष्करी हालचालींवर पाळत ठेवत अचूक नेम साधून हा हल्ला करण्यात आला आणि त्याचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. बलूच लिबरेशन आर्मी अर्थात बीएलएनं हा हल्ला केल्याचं यामध्ये उघड झालं. बलूच आर्मीच्या स्पेशिअल टॅक्टिकल ऑपरेश्न्स स्क्वाड (STOS) नं पाकिस्तानच्या लष्करी वाहनाला निशाणा करत रिमोट कंट्रोल आयईडी स्फोट घडवून आणला.

उपलब्ध माहितीनुसार बोलान येथील माच कुंड भागात हा हल्ला करण्यात आला, जिथं पाकिस्तानचं सैन्य काही लष्करी कारवायांसाठी तयारी करत होतं. या हल्ल्यात 12 ते 14 पाक सैनिकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त जाहीर करण्यात आलं. बलूच आर्मीच्या या हल्ल्यात पाकिस्तान सैन्यातील स्पेशिअल ऑपरेशन्नस कमांडर तारिक इमरान आणि सुभेदार उमर फारूक यांचा मृत्यूही ओढावला असून स्फोटामध्ये वाहनाचा चक्काचूर झाल्याचं व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

https://twitter.com/i/status/1920272078051172790

बलूच आर्मीनं इतक्यावरच न थांबता पाकिस्तानी सैन्याच्या बॉम्ब शोधक आणि विनाशक पथकालाही निशाणा करत केचमधील कुलग तिगरान भागावरही हल्ला चढवला. बुधवारी इथं भारतासोबत पाकिस्तान सैन्याचा सीमाभागात संघर्ष सुरू असतानाच तिथं बलूच आर्मीनंही बॉम्बहल्ला केल्याचं पाहायला मिळालं.

पाकिस्तानवर बलूच आर्मीकडून सातत्यानं होणारे हे हल्ले पुन्हा एकदा बलूचिस्तान आणि पाकिस्तानाच असणारा रक्तरंजित संघर्ष जगासमोर आणत आहेत. बऱ्याच मोठ्या कालावधीपासून बलूचिस्तानातील नागरिकांनी आपल्या स्वतंत्र्य अस्तित्वाची मागणी उचलून झरली आहे. येथील राजकीय अस्थिरता, मानवी हक्कांचं उल्लंघन आणि नैसर्गिक संसाधनांची वानवा अशा कैक आरोपांचा मारा बलूचिस्तानातील फुटीरतावाद्यांकडून पाकिस्तानवर करण्यात येत आहे. त्यातच पाकिस्तानी लष्कराची या प्रांतातील उपस्थिती तणावात आणखी भर टाकत आहे. ज्यामुळं बीएलएकडून पाक लष्कराला वेळोवेळी हल्ल्यांना सामोरं जावं लागत आहे. दरम्यान, सध्या भारताकडून झाललेा वर्जप्रहर आणि आता बीएलएचा स्ट्राईक असा दुहेरी मारा पाकला सोसावा लागत आहे हेच खरं.

India Vs Pakistan : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला घाबरला पाकिस्तान! शरण येण्यास झाला तयार (Video)

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now