महापौर महिला आरोग्य अभियानाचा दिमाखात शुभारंभ; ‘निरोगी सखी राहील सुखी’ उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच शिबिरात १,७५६ महिलांची आरोग्य तपासणी

By: Editor_Pratik

On: Friday, August 7, 2026 11:27 AM

Google News
Follow Us

पुणे, दि. ७ : महिलांचे आरोग्य सुदृढ राहावे, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचावी आणि आरोग्याबाबत जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘महापौर महिला आरोग्य अभियानाचा’ शुभारंभ शुक्रवारी सिंहगड रस्त्यावरील सर्वे क्रमांक १३०, दांडेकर पूल परिसरात राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते झाला. या अभियानाच्या पहिल्याच शिबिरात १,७५६ महिलांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतमाता यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, “महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले ‘महापौर महिला आरोग्य अभियान’ हा लोकाभिमुख आणि समाजोपयोगी उपक्रम आहे. महिलांचे आरोग्य जपणे ही काळाची गरज असून अशा प्रकारचे अभियान शहरातील प्रत्येक भागात राबविणे आवश्यक आहे. महिलांपर्यंत वेळेवर आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल. या अभियानाचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा.”

महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून आयोजित या मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराला परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहिल्याच शिबिरात १,७५६ महिलांनी विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या.

या अभियानाद्वारे महिलांना प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, नियमित आरोग्य तपासणी, आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन आणि आरोग्यविषयक जनजागृती उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. हे अभियान केवळ एका दिवसापुरते मर्यादित नसून वर्षभर शहरातील विविध प्रभागांमध्ये टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. पुढील शिबिरांचे वेळापत्रक आणि स्थळांची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

August 7, 2026

August 7, 2026

August 6, 2026

August 6, 2026

August 6, 2026

August 5, 2026