रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन च्या अध्यक्षपदी मीनल धोत्रे

पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवनच्या अध्यक्षपदी मीनल धोत्रे आणि सचिव पदी शशांक टिळक यांची नियुक्ती झाली आहे.२०२४-२५ या  वर्षासाठी ही नियुक्ती आहे.पदग्रहण सोहळ्यासाठी  प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल शीतल शहा, सहप्रांतपाल प्रियांका कर्णिक उपस्थित होते. या  कार्यक्रमास रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे अनेक पदाधिकारी, रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवनचे सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.येत्या वर्षात नर्मदालय, ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र यांच्याबरोबर भरीव सामाजिक प्रकल्प करण्याचा मनोदय अध्यक्षांनी यावेळी व्यक्त केला.कार्यकारिणीचे पदग्रहण नुकतेच दि. २ जुलै रोजी पुण्याई हॉल, कोथरूड येथे पार पडले.