पुणे, जुलै २०२४ : कमिन्स ग्रुप इन इंडिया (‘कमिन्स इंडिया’) या आघाडीच्या ऊर्जा सोल्यूशन्स तंत्रज्ञान प्रदाता कंपनीने आज महाराष्ट्रातील पुणे येथील बालेवाडी येथे असलेल्या त्यांच्या इंडिया ऑफिस कॅम्पसमध्ये पहिल्या आयटी ग्लोबल कॉम्पीटन्सी सेंटर (जीसीसी) चे उद्घाटन केले. अर्ल न्यूसम, व्हाइस प्रेसिडण्ट व चीफ इन्फर्मेशन ऑफिसर, कमिन्स इन्क. आणि अन्नपूर्णा विश्वनाथन, चीफ इन्फर्मेशन ऑफिसर, कमिन्स इंडिया यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी कमिन्सचे इतर वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
जीसीसी कंपनीच्या बहुवार्षिक आयटी परिवर्तनात्मक धोरणाचा अंतर्गत भाग आहे. हे सेंटर कंपनीला कार्यरत कार्यक्षमता वाढवण्यास आणि बाजारपेठेत त्यांची उत्पादने व सेवा सादर करण्यासाठी लागणारा वेळ जलद करण्यास सक्षम करेल. या सेंटरमध्ये सॉफ्टवेअर इंजीनिअर्स, उत्पादन मालक, आर्किटेक्ट्स, तंत्रज्ञान प्रमुख आणि प्रक्रिया तज्ञ असतील, जे ऑटोमोबाइल, इंजीनिअरिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट, मॅन्युफॅक्चुरिंग अँड एनर्जी सेक्टर्सवर परिणाम करणाऱ्या नाविन्यतेला चालना देतील. 55% महिला कर्मचाऱ्यांसह, जीसीसी लिंग विविधतेमध्ये अग्रेसर आहे आणि सर्व तांत्रिक भूमिकांमध्ये ते अधिक मजबूत करणे हे मुख्य लक्ष केंद्रीत क्षेत्र असेल.
या लाँचबाबत आपला आनंद व्यक्त करत अर्ल न्यूसम, व्हाइस प्रेसिडण्ट अँड चीफ इन्फर्मेशन ऑफिसर, कमिन्स इन्क. म्हणाले, ”भारतातील कमिन्सची यशोगाथा कर्मचारी, प्रगती व क्षमतांशी निगडित आहे. सहा दशकांपासून आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसाठी गुंतवणूक केली आहे आणि सहयोगाने, आम्ही आमची कंपनी व या देशाच्या विकासाला चालना दिली आहे. आम्ही भविष्याकरिता सुसज्ज असताना भारतातील आमचे पहिले आयटी जीसीसी जागतिक स्तरावरील भागधारकांना अपवादात्मक व्यवसाय अनुभव देण्याकरिता आयटी क्षमता निर्माण करण्याच्या दिशेने धोरणात्मक पाऊल आहे. पुण्यातील प्रगतीशील सॉफ्टवेअर लँडस्केप, प्रबळ इंजीनिअरिंग पायाभूत सुविधा आणि दृढ शैक्षणिक इकोसिस्टम आम्हाला देशातील उच्च-स्तरीय टॅलेंटचे लक्ष वेधून घेण्यास मदत करतील. मी आमच्या व्यवसाय विकासाला आणि नाविन्यपूर्ण क्षमतांना चालना देण्यासाठी या जीसीसीच्या क्षमतेबाबत उत्सुक आहे.”
या लाँचबाबत मत व्यक्त करत अन्नपूर्णा विश्वनाथन, चीफ इन्फर्मेशन ऑफिसर, कमिन्स इंडिया म्हणाल्या, ”भारतात लाँच करण्यात आलेले कमिन्सचे पहिले जीसीसी धोरणात्मकरित्या महत्त्वपूर्ण आहे, जेथे आम्हाला गेल्या काही वर्षांमध्ये तंत्रज्ञान लँडस्केप आणि व्यवसाय स्थितींवरील त्यांच्या परिणामांमध्ये झपाट्याने बदल होताना दिसण्यात आले आहे. हे जीसीसी व्यवसाय विकास आणि भारताच्या सतत प्रगतीप्रती आमच्या महत्त्वाकांक्षांशी संलग्न आहे. आम्ही आपल्या देशातील अपवादात्मक टॅलेंट समूहाचा फायदा घेत हे ध्येय साध्य करू, ज्यामुळे डिजिटल सक्षमीकरण व प्रक्रिया परिवर्तनाला चालना मिळेल आणि परिणामत: आम्ही स्पर्धात्मक अग्रस्थानी राहू. मला विश्वास आहे की, इंडिया आयटी जीसीसी कमिन्सच्या जागतिक विकास धोरणामध्ये प्रमुख योगदानकर्ता ठरेल.”
नियमित रोजगाराव्यतिरिक्त जीसीसी तरूण टॅलेंटना इंटर्नशिप प्रोग्राम्स आणि निवृत्त सैन्य कर्मचारी, विशेष गरजा असलेल्या व्यक्ती, प्रसूती रजेनंतर कामावर परतलेल्या महिला आणि पुन्हा कर्मचारीवर्गामध्ये सामील होणारे कर्मचारी यांच्यासाठी रोजगार संधी देईल. आयटी जीसीसी शैक्षणिक संस्थांसोबत देखील सहयोग करेल आणि भावी प्रमुख घडवण्यासाठी प्रोग्राम्स ऑफर करेल.